शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सुरू मात्र धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी हंगामात जवळपास ३५ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा सर्वत्र कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे धान खरेदी उशीरा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या माल उघड्यावर : नुकसानीस जबाबदार कोण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : रब्बी हंगामातील धान खरेदी ४ मे पासून सुरूवात झाली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ७० शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे जाहीर केले. पण नवेगावबांध येथील बाजार समितीच्या आवारातील धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी अद्यापही धान खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने मागील तीन दिवसांपासून ५५० क्विंटल धान खरेदी केंद्रावर येऊन पडून असून त्याचा अद्यापही काटा करण्यात आली नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी हंगामात जवळपास ३५ हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा सर्वत्र कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे धान खरेदी उशीरा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.४ मे पासून जिल्ह्यात रब्बीतील धान खरेदीसाठी एकूण ७० शासकीय धान खरेदी केंद्राना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नवेगावबांध येथील शासकीय धान खरेदी केंद्रावर परिसरातील १० ते १५ शेतकऱ्यांनी ५५० क्विंटल धान विक्रीसाठी ४ मे रोजी आणले. मात्र या खरेदी केंद्रावर अद्यापही या धानाची खरेदी करण्यात आली नाही. परिणामी हे शेतकरी मागील तीन दिवसांपासून धानाचा काटा होईल या प्रतीक्षेत आहेत. त्यातच बुधवारी सायंकाळच्या सुमारास या परिसरात पाऊस झाल्याने काही प्रमाणात धान भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. खरेदी केंद्राचे संचालक यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. अशा शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन एकीकडे धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे सांगत आहे. मात्र दुसरीकडे खरेदी केंद्रावर धान नेऊन त्याचा तीन तीन दिवस काटा करण्यात येत नसल्याने शेतकºयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.आधीच शेतकरी लॉकडाऊन, संचारबंदी व नैसर्गिक संकटांना तोंड देत आहेत. अशात आता त्यांना खरेदी केंद्रावरील कर्मचाºयांच्या अनागोंदी कारभारामुळे पुन्हा नव्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.धर्मकाट्यावर करा खरेदीकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी धर्मकाट्यावर धानाची मोजणी करुन खरेदी करण्यात यावी. यामुळे गर्दी टाळून खरेदीची गती वाढविण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर विचार करुन धर्मकाट्यावर धान खरेदी करण्याची मागणी केली जात आहे.मी ४ मे रोजी ६५ पोते धान नवेगावबांध येथील धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणले. मात्र अद्यापही धानाचा काटा करण्यात आला नाही. परिणामी दररोज धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढत असून धानाचा काटा होत नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावा.- माधव डोंगरवार (शेतकरी)

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड