केंद्राने केली ३० हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:23+5:30

यावर्षी रब्बी हंगामातील धान्य खरेदी करण्यासाठी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला आदिवासी महामंडळाने ३० जूनपर्यंत धान्य खरेदी करण्याची मुदत दिली होती. परंतु संस्थेने मुदत संपण्यापुर्वीच परिसरातील शेतकऱ्यांचे ३० हजार क्विंटल धान खरेदी करुन ९० टक्के धान खरेदीचा विक्रम करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला.

The Center procured 30,000 quintals of paddy | केंद्राने केली ३० हजार क्विंटल धान खरेदी

केंद्राने केली ३० हजार क्विंटल धान खरेदी

ठळक मुद्देआदिवासी संस्थेचे केंद्र : ९० टक्के धान खरेदीचा विक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून मुदतीच्या आत रब्बी हंगामातील ३० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून त्याची ९० एवढी टक्केवारी आहे.
यावर्षी रब्बी हंगामातील धान्य खरेदी करण्यासाठी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला आदिवासी महामंडळाने ३० जूनपर्यंत धान्य खरेदी करण्याची मुदत दिली होती. परंतु संस्थेने मुदत संपण्यापुर्वीच परिसरातील शेतकऱ्यांचे ३० हजार क्विंटल धान खरेदी करुन ९० टक्के धान खरेदीचा विक्रम करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने लॉकडाऊन जाहिर केले होते. या कालावधीत हमाल किंवा मजूर मिळत नसतानाही संस्थेने संचालकांच्या सहकार्याने धान खरेदी करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे.
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान साठवून ठेवण्यासाठी शासकीय गोदाम कमी पडत असल्यामुळे संस्थेने शासनाकडून कोणत्याही प्रकारचे भाडे न घेता धान साठवून ठेवण्यासाठी गोदाम तयार केले आहे.
यंदा धान खरेदीचे १०० टक्के उद्दिष्ट लक्षात ठेवून शेतकऱ्यांचे धान पावसाने खराब होवू नये यासाठी गावातील २ गोदाम भाड्याने घेवून सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धान खरेदी करण्याची मुदत अजून संपण्यासाठी काही दिवस उरले असतानाही शेतकरी केंद्रात येत आहेत.
१०० टक्के धान खरेदी करण्याचे उद्दीष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने संस्था प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा संचालक विनोद पाटील गहाणे व योगेश नाकाडे यांनी सांगीतले.

Web Title: The Center procured 30,000 quintals of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.