नियमांमध्ये राहूनच उत्सव साजरा व्हावा
By Admin | Updated: August 31, 2014 23:53 IST2014-08-31T23:53:41+5:302014-08-31T23:53:41+5:30
इतर सणांमध्ये डिजे लावून धिंगाणा घालण्यापेक्षा गणेशोत्सवातील ‘धूम’ योग्य आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचा उत्सव साजरा करताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमाच्या अधिनच राहून हा

नियमांमध्ये राहूनच उत्सव साजरा व्हावा
लोकमत परिचर्चा : गोंदियातील गणेश मंडळाच्या सदस्यांचा सूर
गोंदिया : इतर सणांमध्ये डिजे लावून धिंगाणा घालण्यापेक्षा गणेशोत्सवातील ‘धूम’ योग्य आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचा उत्सव साजरा करताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमाच्या अधिनच राहून हा उत्सव साजरा करावा, आणि तो केल्या जात आहे, असा सूर ‘लोकमत’ने शनिवारी आयोजित केलेल्या परिचर्चेतून उमटला.
गणेशोत्सवातून लोकांना प्रेरणा मिळेल असे अनेक उपक्रम या निमित्ताने राबविले जातात. मंडळातील अनेक सदस्य दारू, सिगारेटचे व्यसन वर्षभर करतात. परंतु या गणेशोत्सवात एकही दिवस व्यसन करीत नाही. व्यसनाच्या अधिन झालेले लोकही या उत्सवात व्यसनापासून दूर असतात ही एक उपलब्धीच असल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चेला रामनगर नवयुवक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष बेबी अग्रवाल, उपाध्यक्ष मनिष फुंडे, सचिव स्वप्नील गोळे तर मामा चौक मित्र परिवार गणेश मंडळ, सिव्हील लाईन गोंदियाचे अध्यक्ष अभय अग्रवाल, सहसचिव सुशांत कुथे उपस्थित होते. बेबी अग्रवाल म्हणाले, आम्ही या उत्सवादरम्यान रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करतो. मंतीमंद मुलांना गोड पदार्थ वितरण करणे, मद्यप्राशन करणाऱ्यांना मंडपातच न येऊ देणे, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. याचाच परिपाक म्हणून रामनगर पोलिसांकडून मागच्या वर्षी प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोलिसांकडून बेटी बचाव, वृक्षारोपण व वाहतूक नियम या तीन विषयाला घेऊन गणेश मंडळांना बक्षीस देण्यात आले. पर्यावरण संकल्पनेला घेऊन रामनगर गणेश मंडळाने उपक्रम राबविल्यामुळे त्यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. मामा चौकातील मित्र परिवार मंडळाने कौटुंबिक हिंसाचार, आंगणवाडी व वृक्षारोपण या विषयावर जनजागृती घडवून आणली. गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य विर्सजन नदी, नाले, विहीर यांच्यात न करता ते जमिनीत पुरून त्याचे खत तयार करण्याचे काम आपला गणेश उत्सव मंडळ करीत असल्याचे अभय अग्रवाल म्हणाले. गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी उत्साहात पण पर्यावणपूरक हा उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)