गोरेगावच्या पतसंस्थेतील ५३ लाख हडपणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:34+5:302021-02-05T07:47:34+5:30
अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. गोरेगाव या पतसंस्थेत ठेवीदारांची व कर्जदारांची जमा रकमेतील पतसंस्थेत शिल्लक ...

गोरेगावच्या पतसंस्थेतील ५३ लाख हडपणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. गोरेगाव या पतसंस्थेत ठेवीदारांची व कर्जदारांची जमा रकमेतील पतसंस्थेत शिल्लक असलेली ५१ लाख ९ हजार २०२ रुपयांची अतिरिक्त उचल केली आहे. सभासदांना लाभांश वाटपाचे ११ लाख ७ हजार ५१२ रुपये प्रत्यक्षपणे वाटप न करता या रकमेचा अपहार केला. विद्युत बिल रकमेचर भरणा कमी असतानासुद्धा १२ हजार २९३ रुपये जास्त रकमेचे बिल दाखविण्यात आले. प्रवास खर्चाचा वापर २६ हजार ४० रुपयांचा नसतानासुध्दा स्वत: अपहार केला. मागील सन २०१८ ते २०१९ या आर्थिक वर्षात अतंर्गत लेखा परीक्षण शुल्क रुपये २४ हजार व फर्निचर खर्च ९ हजार ८०० रुपये असा एकूण ३३ हजार ८०० रुपये खर्च दाखविण्यात आला. एकंदरीत ५३ लाख १३ हजार ७९७ रुपयांचा अपहार करण्यात आला. या संदर्भात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांच्या तक्रारीवरून शाखा व्यवस्थापक भुमेश्वर चिंतामन बिसेन (४२) रा. पूरगाव, लेखापाल राजेश छबीलाल रहांगडाले (४०) रा. महाजननगर गोरेगाव व भुमेश्वर छबीलाल रहांगडाले (५१) रा. महाजननगर ठाणा रोड गोरेगाव या तिघांवर भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ३४, सहकलम ३,४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे) अधिनियम १९९९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.