शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन ...

ठळक मुद्देकांदबरी बलकवडे : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी (दि.१५) आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहुल खांडेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी १ जूनपासून मान्सूनचा कालावधी सुरू होणार आहे. सर्व विभागांनी नैसर्गीक आपत्तीचे पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये पूर परिस्थितीचे संभाव्य धोके आहेत. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमध्ये उपाययोजना करण्यासंबंधी सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. धान्य, औषध साठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध असल्यास नैसर्गीक आपत्तीला तोंड देण्यास सोयीस्कर होईल असे त्यांनी सांगीतले. तसेच नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत यांना त्यांच्या क्षेत्रात असलेल्या नाले, नाली सफाईचे काम करण्याच्या सूचना या वेळी त्यांनी दिल्या. पावसाळ््यात जलजन्य व किटकजन्य आजारांची साथ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध करु न ठेवावा. तालुकानिहाय गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्या तयार कराव्यात.पर्जन्यमानाची आकडेवारी सर्व तालुक्यात दररोज सकाळी ८ वाजतापर्यंत अद्ययावत करुन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. सभेला सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद - नगरपंचायत मुख्याधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सभेत विषयांचे सादरीकरण आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी