भरधाव कार झाडाला आदळून एक ठार
By Admin | Updated: September 15, 2014 00:13 IST2014-09-15T00:13:37+5:302014-09-15T00:13:37+5:30
भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला झाडाला आदळून घडलेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला. तर कारमध्ये असलेल्या तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला

भरधाव कार झाडाला आदळून एक ठार
देवरी : भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला झाडाला आदळून घडलेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला. तर कारमध्ये असलेल्या तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला पाठविण्यात आले आहे. येथून १० किमी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील ग्राम सिरपूर येथे रविवारी (दि.१४) दुपारी १२.१५ वाजता दरम्यान ही घटना घडली. मृत तरूणाचे नाव नितीन राजकुमार शातीजा (२८,रा.भंडारा) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, नितीन शातीजा, सागर शातीजा, घनश्याम पटेल व दिनेश भोजवानी (२६,रा.भंडारा) हे हुंदई कार एमएच ३६/ एच २९७७ ने रायपूरला नितीनच्या बहिणीकडे जात होते. ग्राम सिरपूर येथे तुडलेल्या रस्ता दुभाजकाला पार करीत असलेली दुचाकी अचानक त्यांच्या कार समोर आली. यामध्ये दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालवित असलेल्या सागरचे कारवरील नियंत्रण सुटले व भरधाव वेगात कार रस्त्याच्या कडेला झाडाला आदळली. हा अपघात एवढा जबर होता की, यामध्ये कार चांगलीच क्षतिग्रस्त झाली असून नितीन जागीच ठार झाला. तर दिनेशला गंभीर मार असल्याने त्याला नागपूरला पाठविण्यात आले. सागर आणि घनश्याम हे दोघे सुरक्षीत आहेत.
विशेष म्हणजे, या चौपदरी राष्ट्रीय महागार्वावर सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता दुभाजक बनविण्यात आले आहे. मात्र काही हॉटल व्यवसायीकांनी आपल्या फायद्यासाठी दुभाजक जागोजागी तोडले आहे. आणि हेच अपघातांचे कारण बनत आहे. (प्रतिनिधी)