कत्तलखान्यात जाणारा जनावरांचा ट्रक पकडला
By Admin | Updated: May 15, 2017 00:20 IST2017-05-15T00:20:02+5:302017-05-15T00:20:02+5:30
तिरोडाच्या इंडियन आॅईल पेट्रोल पंप जवळ कत्तलखान्यात जात असलेला जनावरांनी भरलेला ट्रक

कत्तलखान्यात जाणारा जनावरांचा ट्रक पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडाच्या इंडियन आॅईल पेट्रोल पंप जवळ कत्तलखान्यात जात असलेला जनावरांनी भरलेला ट्रक उपविभागीय अधिकाऱ्यांनी पकडला. ही कारवाई शुक्रवारी रात्री १० वाजता करण्यात आली. पोलिसांनी ट्रक व त्यात असलेली जनावरे असा एकूण चार लाख ८० हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.
ट्रक क्रमांक एमएच २०/बीटी-३९१८ मध्ये २० जनावरे कोंडून वाहतूक करीत असताना उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी सदर जनावरांचा ट्रक इंडियन आॅईल पेट्रोल पंपाजवळ पकडला. या संदर्भात बालाघाट जिल्ह्याच्या लालबर्रा येथील शोएब खान अजीज खान(२६), कपूरचंद श्रीराम भोपे (४६,रा.आमगाव) या दोघांवर तिरोडा पोलिसांनी प्राण्याच्या निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (ड) (ई)(फ) सहकलम ५ अ, १,२,५, ब प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पकडलेल्या ट्रकची किंमत चार लाख रुपये तर त्यात असलेल्या जनावरांची किंमत ८० हजार रुपये सांगितली जाते.