घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:07+5:30
बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार हीच आता गोंदिया शहराची शान बनून राहिली आहे. शहरातील वस्त्या असो की वसाहती सर्वांची गत तीच आहे. सर्वत्र घाणीचे ढिगार आहे ते आहेच. नगर परिषदेकडून कचऱ्याची नित्यनेमाने उचल केली जाते मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती तीच असते, ही आश्चर्याची बाब आहे.

घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा मिळेना
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर नगर परिषदेला काही तोडगा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कारण बघावे तेथे लागलेले कचऱ्याचे ढिगार याची प्रचिती करवून देते. सण असो वा उत्सव मात्र कचऱ्याची ही समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरवासीयांचा श्वास कोंडत चालला असून आणखी किती दिवस या प्रकारात वावरावे लागणार असा सवाल आता शहरवासी करू लागले आहेत.
जिल्ह्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नगर पंचायत आपल्या पायावर उभे होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. स्वच्छतेसाठी नगर पंचायतींमध्ये नवनवे प्रयोग राबविले जात असून त्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र जिल्ह्याचे स्थळ असलेल्या गोंदिया नगर परिषदेला याचे काहीच सोयरसुतक नाही. कारण शहरातील कचऱ्याची स्थिती आता बारमाहीच झालेली आहे. दिवस उजाडत चालले आहेत मात्र शहरवासीयांना घाणीच्या विळख्यात श्वास घ्यावा लागत आहे.
बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार हीच आता गोंदिया शहराची शान बनून राहिली आहे. शहरातील वस्त्या असो की वसाहती सर्वांची गत तीच आहे. सर्वत्र घाणीचे ढिगार आहे ते आहेच. नगर परिषदेकडून कचऱ्याची नित्यनेमाने उचल केली जाते मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती तीच असते, ही आश्चर्याची बाब आहे. यातून स्वच्छतेसाठी पाहिजे तसे प्रयत्न होत आहे की नाही असा प्रश्न पडतो. ते काही असो, मात्र या सर्वांचा त्रास शहरवासी भोगत आहेत. यातून नगर परिषदेचा स्वच्छता विभाग कोठेतरी कमगकूवत पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. आजघडीला शहरवासीयांचा नगर परिषद व निवडून दिलेल्या नगरसेवकांवरून विश्वास उडत चालला आहे.
कचऱ्याचे ढिगार, त्यावर डुकरांचे कळप व कचऱ्यातून दुर्गंध व डासांची उत्पत्ती आजारांना पोषक ठरत आहे. अशा या वातावरणात शहरवासीयांचे आरोग्य कितपत सुरक्षीत आहे, ही गंभीर बाब आहे.
यावर मात्र नगर परिषदेकडून तोडगा काढणे कठीण दिसत आहे. यामुळेच शहराचे वातावरण दिवसेंदिवस दिवस प्रदुषीत होत चाचले असून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. त्यामुळे कचऱ्याच्या या समस्येवर त्वरीत तोडगा काढण्यात यावा अशी ओरड शहरवासी करीत आहेत.
शहरातील कचराकुंड्या तुंबलेल्याच
कचरा एकाठिकाणी जमा व्हावा या उद्देशातून शहरात प्रभागनिहाय कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. या कचराकुंड्या कचऱ्याने तुंबलेल्या असल्याचे दिसून येत असून कचरा बाहेर पडत आहे. मात्र स्वच्छता विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी त्या परिसरात दुर्गंध पसरत आहे. एवढ्यावरही कचराकुंड्यांची स्वच्छता होत नसल्यास नगर परिषदेची जबाबदारी काय असा सवाल आता शहरवासी करीत आहेत.
डासजन्य आजारांचा जोर वाढला
शहरात सध्या डासांचा प्रकोप वाढला आहे. यामुळे शहरात डासजन्य आजारांचा जोर वाढला आहे. रूग्णालयांत मोठ्या संख्येत रूग्णांची गर्दी वाढली असून यात मलेरियाचे रूग्ण जास्त असल्याची माहिती आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसते. स्वच्छता विभाग फक्त कचरा उचलून मोक ळा होतो. मात्र त्यापलीकडे दुसरी कोणतीच जबाबदारी त्यांच्यावर नसल्याचे जाणवते.