शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेची मान्यता रद्द करा

By admin | Updated: February 25, 2017 00:27 IST

देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या मकरधोकडा येथील स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेतील

पत्रपरिषद : आदिवासी संघटनांचा आंदोलनाचा इशारा गोंदिया : देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या मकरधोकडा येथील स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेतील वर्ग नववीच्या विद्यार्थिनीवर तेथील चौकीदाराने अत्याचार केला. शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सदर आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी आदिवासींच्या विविध संघटनांनी गोंदियात घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. पत्रपरिषदेत अ‍ॅड. विवेक धुर्वे, माजी पं.स. सदस्य जगतकुमार नेताम, आॅल इंडिया आदिवासी संघटनेचे चेतन उईके, बिरसा ब्रिगेडचे जिल्हा संघटक मधू दिहारी, देवरी आदिवासी संघटनेचे लोकनाथ तितराम, आदिवासी गोंड सेवाभावी संस्था देवरीचे तालुका सचिव नामदेव आचले, आदिवासी कर्मचारी संघटनेचे युवराज कोल्हारे, आदिवासी कर्मचारी संघटनेचे सहसचिव रमेश उईके आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी विद्यार्थ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याने या आश्रमशाळेची मान्यता ६ जुलै २०१३ रोजी रद्द करण्यात आली. मात्र पुन्हा २६ मे २०१४ रोजी मान्यता देण्यात आल्याने शाळा पूर्ववत सुरू झाली. त्यानंतरही विद्यार्थी मृत्यूचे सत्र थांबलेले नाही. बलात्कार पीडित विद्यार्थिनी दि.१८ तारेखला शाळेत हजर असल्यामुळे हजेरी रजिष्टवर ‘पी’ असे नोंदविले होते. मात्र नंतर ते ओव्हरराईट करून गैरहजर दाखविण्यासाठी ‘ए’ दाखविण्यात आले. त्या मुलीला घटनेनंतर तिच्या मामाकडे पाठविल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या प्रकारामुळे मुख्याध्यापक, संस्थापक, शाळा व्यवस्थापन सदर प्रकरण दडपण्याच्या तयारीत होते, असा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. शाळा व्यवस्थापन, संस्थाचालक, मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी घटनेचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा. मुख्याध्यापक पी.एम. उकरे यांना बडतर्फ करावे, शाळेची मान्यता रद्द करून बंद करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी सर्व आदिवासी संघटना देवरी येथील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. (प्रतिनिधी)