तणसाचे ढीग जळून भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:01 IST2018-06-02T21:01:30+5:302018-06-02T21:01:30+5:30
येथील शेतकरी हऊसलाल नागपुरे यांच्या घरासमोर ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला अचानक आग लागून संपूर्ण तणस भस्मसात झाला. शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात नागपुरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्याकडील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

तणसाचे ढीग जळून भस्मसात
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : येथील शेतकरी हऊसलाल नागपुरे यांच्या घरासमोर ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला अचानक आग लागून संपूर्ण तणस भस्मसात झाला. शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात नागपुरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्याकडील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
उन्हाळी धान पिकाची मळणी झाल्याने पावसाळ््यात जनावरांच्या चाºयाची सोय म्हणून हऊसलाल नागपुरे यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून तीन ट्रॅक्टर तणस खरेदी केले होते. तणसाचे हे ढिगारे त्यांनी आपल्या घरासमोर अंगणात ठेवले होते. दरम्यान शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजताच्या सुमारास अचानकच तणसाच्या ढिगाला आग लागली. आगीच्या ज्वालांची धग बघून गावात एकच खळबळ माजली.
यावर गावातील ताराचंद बंसोड, खुशाल शहारे, मनोज शहारे, देवराम मानवटकर, लच्छू कुरसुंगे, धनलाल नागपुरे, सुरजोती नागपुरे यांनी वामन लांजेवार यांच्या घरातील बोअरवेलचे पाणी उपसून आगीला नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीमुळे तणसाचे ढिग जळून भस्मसात झाले. यात नागपुरे यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले असून त्यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तणस जळून झालेल्या नुकसानाची शासनाने भरपाई देण्याची मागणी नागपुरे व गावकºयांनी केली आहे.
विशेष म्हणजे, या आगीवर वेळीच पाण्याचा मार केल्याने आग पसरली नाही व अन्य अप्रिय घटना घडली नाही. कारण, तणसाचे ढिग होते तेथून थोड्याच अंतरावर नागपुरे यांचे घर आहे. तणस हलके असल्याने उडून घराकडे गेले असते तर त्यातून आग पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र गावकºयांनी वेळीच पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा धोका टळला.