पाथरीच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार
By Admin | Updated: February 3, 2015 22:57 IST2015-02-03T22:57:38+5:302015-02-03T22:57:38+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खासदार आदर्श गाव विकास योजनेअंतर्गत राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी पाथरी गावाला दत्तक घेतले. गावाच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार झाला.

पाथरीच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार
कुऱ्हाडी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खासदार आदर्श गाव विकास योजनेअंतर्गत राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी पाथरी गावाला दत्तक घेतले. गावाच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार झाला. १७ फेब्रुवारीला त्यांच्या जन्मदिवसी पाथरीत या कामांचा शुभारंभ होणार आहे.
यावेळी खा.पटेल यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी वर्षा पटेलही राहणार आहेत. ४ हजार लोकसंख्या असलेल्या पाथरी गावाला दत्तक घेतल्यानंतर तेथील कामांचा आढावा घेण्यात आला. १७ फेब्रुवारीला १.२५ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी आ.राजेंद्र जैन व पं.स.सदस्य केवल बघेले प्रयत्नशील आहे. गावकऱ्यांच्या साक्षीने जन्मदिवसाचा केकही कापला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरीक्त पाथरी व भुताईटोला येथे १ कोटींची मनरेगामार्फत विकास कामे होणार आहेत.
त्यात तीन लाखांचा रंगमंच, डावीकडवी विचारसरणीतून नाल्याचे ते बांधकाम जलशुध्दीकरण सयंत्राचे कार्य होणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना शुध्द जल पिण्यासाठी मिळणार आहे.
याबाबतचा आढावा घेतला त्याप्रसंगी ग्राम पंचायतच सर्व पदाधिकारी ग्राम विस्तार अधिकारी के.एम. रहांगडाले, सर्व शाळांचे मुख्याध्यापक वलथरे, नूर, बोपचे, नागोसे व गावातील गनमान्य नागरीक उपस्थित होते.
विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एफ.सी.पटले यांनी केले.(वार्ताहर)