बुध्दाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व धम्म सोहळा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:10+5:302021-02-06T04:54:10+5:30
चान्ना-बाक्टी येथील आनंद बुध्द विहार समितीच्यावतीने आनंद बुध्द विहारात दोन दिवसीय धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यांतर्गत, शनिवारी ...

बुध्दाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व धम्म सोहळा आज
चान्ना-बाक्टी येथील आनंद बुध्द विहार समितीच्यावतीने आनंद बुध्द विहारात दोन दिवसीय धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यांतर्गत, शनिवारी पहिल्या सत्रात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येईल. भगवान बुध्दांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भंते चारुदत्त थेरो, भंते कुणाल किर्ती, भिक्खुणी सुभेदा माता यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भगवान बुध्दांच्या मूर्तीचे अनावरण आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुनील मेंढे, सरपंच देवका मरस्कोल्हे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर ठवरे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष रचना गहणे, माजी उपसभापती लायकराम भेंडारकर, पंचायत समिती माजी सभापती अरविंद शिवणकर, जि.प. माजी सदस्य किशोर तरोणे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष लोकपाल गहणे, रत्नदीप दहिवले, उमाकांत ढेंगे, अजय लांजेवार, डॉ. गजानन डोंगरवार, सोनदास गणवीर, मोरेश्वर सोनवाने, वैद्यकीय अधिकारी श्वेता कुळकर्णी उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसीय धम्म मेळाव्यात रविवारी सकाळी धम्म रॅली काढली जाणार आहे. दुपारच्या सत्रात गावातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार, रात्री मिलिंद रामटेके यांनी दिग्दर्शित केलेल्या व आनंद बुध्द विहार महिला समितीच्यावतीने संगीत ‘साजणा शोधू कुठे किनारा’ या सामाजिक नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. धम्म सोहळ्यात सहभागी व्हावे असे आनंद बुध्द विहार समितीने कळविले आहे.