नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील बकी गेट ठरतेय पर्यटकांसाठी पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:33 IST2019-05-09T12:32:49+5:302019-05-09T12:33:16+5:30
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात असलेल्या नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील बकीगेट पर्यटकांसाठी पर्वणी ठरते आहे.

नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील बकी गेट ठरतेय पर्यटकांसाठी पर्वणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात असलेल्या नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील बकीगेट पर्यटकांसाठी पर्वणी ठरते आहे. येथे विविध प्राणी मुबलक संख्येने बघायला मिळत आहेत. त्यात वाघ, बिबट, हरीण, सांभर , चीतर, नीलगाय, सासे, अस्वल, नीलघोडा, रानडुक्कर, मोर, लावा, तितर, लांडोर, गुंधुर लावा, नीलकंठ, रान कुत्रे आदी आहेत. बकी गेटनी पर्यटन केल्यास हमखास वन्य प्राण्यांचे दर्शन होते. बकी गेट हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कोहमारा गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. सध्या येथे गाईड नसल्यामुळे शासनाचे हंगामी मजूर पर्यटकांसोबत पाठविले जात आहेत. त्यासाठी पर्यटकांना वेगळे शुल्क द्यावे लागत नाही.