वहिनीशी वाद घालणाऱ्या भावाचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:14+5:30

गणेश बुधराम मेंढे (३८) रा. खमारी असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. महेश बुधराम मेंढे असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. गणेश हा वहिनीला पाणी देण्याच्या कारणावरुन मारहाण करीत होता. या दरम्यान महेशने गणेशला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. यावरुन गणेश आणि महेश या दोघांमध्येच वाद झाला. दरम्यान महेशने गणेशचा गळा आवळून खून केला.

Brother murdered for arguing with brother | वहिनीशी वाद घालणाऱ्या भावाचा केला खून

वहिनीशी वाद घालणाऱ्या भावाचा केला खून

ठळक मुद्देखमारी येथील घटना : आरोपीला एका तासात अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वहिनीशी वाद करीत असलेल्या भावाचा लहान भावानेच गळा आवळून खून केल्याची घटना तालुक्यातील खमारी येथे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश बुधराम मेंढे (३८) रा. खमारी असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. महेश बुधराम मेंढे असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. गणेश हा वहिनीला पाणी देण्याच्या कारणावरुन मारहाण करीत होता. या दरम्यान महेशने गणेशला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. यावरुन गणेश आणि महेश या दोघांमध्येच वाद झाला. दरम्यान महेशने गणेशचा गळा आवळून खून केला. यानंतर महेश घटनास्थळावरुन पसार झाला होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी भांदवीच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आरोपी महेशला घटनेनंतर एका तासातच अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर, अभिजीत भुजबळ, उपनिरीक्षक उमेश गुटाल, रोहीदास भोर, हवालदार जितेंद्र मिश्रा, शेखर खोब्रागडे, सुनील गोस्वामी, शरद चव्हाण, अमिद नेवारे, राकेश इंदूरकर यांनी केली. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

Web Title: Brother murdered for arguing with brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.