शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कोविड दक्षता समितीच्या सभेत मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

डव्वा या गावास कोअर झोन व गोपालटोली, पळसगाव, भूसारीटोला, चिरचाडी, घोटी या गावाला बफर झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. डव्वा या गावातील येणारे व जाणारे सर्व मार्ग त्वरीत बंद करीत या परिसरात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात आले आहे.

ठळक मुद्देडव्वा कंटेन्मेंट झोन : प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यातील जि.प. डव्वा येथे कोविड दक्षता समितीची सभा गुरूवारी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. डव्वा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या परिसरात प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यातबाबत सभेत निर्देश देण्यात आले.डव्वा या गावास कोअर झोन व गोपालटोली, पळसगाव, भूसारीटोला, चिरचाडी, घोटी या गावाला बफर झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. डव्वा या गावातील येणारे व जाणारे सर्व मार्ग त्वरीत बंद करीत या परिसरात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात आले आहे. शासकीय अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, तातडीचे वैद्यकीय कारणे, खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोर्स, रुग्ण वाहिका, जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे व्यक्ती यांना यातून वगळण्यात आले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत किराणा दुकान,फार्मसी, कृषी केंद्र, दवाखाना इत्यादी जीवनावश्यक बाबी सोडून बाकी सर्व दुकानें बंद राहतील. तसेच किराणा, कृषी केंद्र हे केवळ सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. शुक्रवारपासून १४ दिवसापर्यंत आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका व शिक्षक मिळून प्रत्यक्ष गृहभेटी देऊन सर्व्हे करणार आहेत. त्यांना सर्व ग्रामवासीयांनी सहकार्य करावे. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, जिभेची चव जाणे, नाकाला गंध न समजणे असे लक्षणे असल्यास सांगावे. कुणीही असे लक्षणे असल्यास लपवू नये. तसेच शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक असल्यास घराबाहेर जाताना मास्क अवश्य वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. सभेला खंडविकास अधिकारी प्रकाश निर्वाण, नायब तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ.देव चांदेवार, ठाणेदार अनिल कुमरे, सरपंच पुष्पमाला बडोले,उपसरपंच चेतन वडगाये, एफ.आर.टी.शहा, सचिन रहांगडाले, मुख्याध्यापक सिंगनजुडे, तलाठी कमलेश पटले, झामाजी चौधरी, राकेश जैन, विजय गावराने, संगीता कापगते उपस्थित होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या