इटियाडोह धरणाच्या कालव्यात मुलगा वाहून गेला; मित्रांसह गेलेला पोहायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:49 IST2025-04-04T19:49:43+5:302025-04-04T19:49:53+5:30
मित्रांसह शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास गावाजवळून गेलेल्या इटियाडोह धरणाच्या कालव्यावर आंघोळीसाठी गेला होता.

इटियाडोह धरणाच्या कालव्यात मुलगा वाहून गेला; मित्रांसह गेलेला पोहायला
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : इटियाडोह धरणाच्या कालव्यात मित्रांसह आंघोळीसाठी गेलेला एक १४ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना शुक्रवारी (दि.४) दुपारी दीड वाजताच्या सुमारास तालुक्यातील वडेगाव स्टेशन घडली. आर्यन प्रमोद शहारे (१४) रा. वडेगाव स्टेशन असे कालव्यात वाहून गेलेल्या बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार वडेगाव स्टेशन येथील रहिवासी आर्यन शहारे आपल्या मित्रांसह शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास गावाजवळून गेलेल्या इटियाडोह धरणाच्या कालव्यावर आंघोळीसाठी गेला होता. कालव्यात आंघोळ करीत असताना त्याचा तोल गेल्याने तो वाहून गेला. त्याच्यासह आंघोळीसाठी गेलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने आर्यन दूरवर वाहून गेला. त्याच्या मित्रांनी गावात जाऊन याची माहिती आर्यनच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी याची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचत शोध कार्याला सुरुवात केली. शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत आर्यनचा शोध लागला नव्हता. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के करीत आहेत.