आई तुला नमन :
By Admin | Updated: May 11, 2014 00:27 IST2014-05-11T00:27:11+5:302014-05-11T00:27:11+5:30
आई तुला नमन :

आई तुला नमन :
आईचे ऋण तर कुणीही फेडू शकत नाही. स्वत:ची आवड-निवड बाजूला ठेवून अगदी मनापासून आई आपल्या मुलांना वात्सल्य देते. मातृदिनाच्या पूर्वसंध्येला आमगाव येथील तनुजा संदीप मेश्राम आपल्या मुलांना मातृदिनानिमित्त या दिनाचे महत्त्व पटवून देत आहे. आई मुलांना लहानपणापासून सांभाळते. त्यांच्या हसण्या-रडण्यात तिचे हसणे-रडणे सामावलेले असते. आपल्या मुलांना नेहमी हसते व आनंदी कसे ठेवता येईल यासाठीच ती नेहमी प्रयत्नशील असते. बालपणापासून बाळांवर संस्कार करणारी आई ही मुलांची प्रथम गुरू होय.