शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही ‘पीयुसी’ केंद्र होणार ‘सस्पेंड’

By admin | Updated: January 31, 2015 23:21 IST

कोणतेही वाहन न दाखविता आणि प्रत्यक्ष वाहनाची तपासणी न करताच वाहन प्रदुषणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या गोंदियातील दोन्ही पीयुसी केंद्रांना गोंदियाच्या परिवहन विभागाने आज जोरदार दणका दिला.

आरटीओंनी दिली नोटीस : लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनने सारेच अवाकगोंदिया : कोणतेही वाहन न दाखविता आणि प्रत्यक्ष वाहनाची तपासणी न करताच वाहन प्रदुषणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या गोंदियातील दोन्ही पीयुसी केंद्रांना गोंदियाच्या परिवहन विभागाने आज जोरदार दणका दिला. त्यांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली असून त्यासाठी त्यांना शनिवारी तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.लोकमतने दोन्ही पीयुसी केंद्रांवर पीयुसी प्रमाणपत्र देण्याच्या नावावर चालणाऱ्या खेळखंडोबाचे ‘स्टींग आॅपरेशन’ करून ते शनिवारच्या अंकात प्रकाशित केले. ‘५० रुपयात करा वाहन प्रदुषणमुक्त’ या मथळ्याखाली प्रकाशित या वृत्ताने गोंदियात चांगलीच खळबळ उडाली. शहर पोलीस ठाण्यात उभ्या असलेल्या आणि जिल्हा परिषदेच्या आवारातील एका भंगारात ठेवलेल्या गाडीलाही पियुसी प्रमाणपत्र कसे सहज मिळते हे पुराव्यासह लोकमतने दाखवून दिले. नियम धाब्यावर बसवून आणि नागरिकांच्या जीवनमानाशी खेळ करणाऱ्या या प्रकाराची परिवहन विभागानेही गंभीर दखल घेतली. प्र. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.आर.निमजे यांनी ‘लोकमत’च्या बातमीचा आधार घेत आणि पीयुसी केंद्रांनी दिलेल्या पावती क्रमांकांची खात्री केल्यानंतर जयस्तंभ चौकातील चाचा पीयुसी सेंटर आणि रामनगरातील हार्दिक पीयुसी सेंटरला नोटीस पाठविली. ७ दिवसांच्या आत यावर खुलासा करावा, असे सांगून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेशही कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. (जिल्हा प्रतिनिधी)