शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेल खोदणाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

बोअरवेल खोदणारा ऑपरेटर, ड्रायव्हर व ८ मजूर असे दहा लोक त्या ट्रकने येत असताना दोन मोटारसायकलवर बसून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून आपले वाहन समोर नेले. त्यानंतर रस्त्यावर मोटारसायकल उभे करून त्यांना अडविले. चाकू, बंदूक दाखवून त्यांच्याकडून पैसे हिसकावले. त्यांच्या बॅगमध्ये फक्त २ हजार रूपये होते.

ठळक मुद्देचौघांना अटक । वाहनातील कॅमेऱ्याने आरोपींचे चित्र टिपल्याने फुटले बिंग

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील शिलापूर येथील पुलाजवळ १३ मे च्या रात्री ८.३० वाजता चाकू व बंदुकीच्या धाकावर बोअरवेल खोदणाऱ्या मजुरांना २ हजार रुपयांनी लुटल्याची घटना घडली. या संदर्भात देवरी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.तामीळनाडूच्या नामकल जिल्ह्यातील आधीथीर चित्तलंगूर त्रिच्चेगोड हे देवरी तालुक्याच्या पुराडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात १३ मे रोजी बोअरवेल खोदायला गेले. बोअरवेल खोदणारा ऑपरेटर, ड्रायव्हर व ८ मजूर असे दहा लोक त्या ट्रकने येत असताना दोन मोटारसायकलवर बसून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून आपले वाहन समोर नेले. त्यानंतर रस्त्यावर मोटारसायकल उभे करून त्यांना अडविले. चाकू, बंदूक दाखवून त्यांच्याकडून पैसे हिसकावले. त्यांच्या बॅगमध्ये फक्त २ हजार रूपये होते.२५ वर्ष वयोगटातील ते आरोपी असल्याचे सांगितले जाते. त्या सर्वांचे छायाचित्र बोअरवेलच्या ट्रकला लावलेल्या कॅमेºयात कैद झाले. देवरी पोलिसांनी त्या चौघांवर भादंविच्या कलम ३९४, ३४१ सहकलम ३,२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना देवरी पोलिसांनी अटक केली आहे. देवरी ते शिलापूर हे पाच ते सहा किलो मिटरचे अंतर आहे. या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्याची माहिती तक्रारकर्त्यांनी वेळीच पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. आधी चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज पाहिले, गुन्ह्यातील आरोपींपर्यंत पोहचल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींपर्यंत पोलीस पोहचले नसते तर गुन्हा दाखल झाला नसता काय असा सवाल उपस्थित होत आहे.या प्रकरणात देवरी पोलिसांनी आशिष युगलकुमार शर्मा (२२) रा. वॉर्ड क्रमांक १४ देवरी, आकाश युगुलकुमार शर्मा (२२) रा. वॉर्ड क्रमांक १४ देवरी, सचिन हेमराज मेश्राम (२५) रा.भागी, सौरभ बाळकृष्ण गायधने (२०) रा. मुरदोली ता. देवरी या चौघांना अटक केली आहे.

टॅग्स :Robberyचोरी