रसाळ फळे ठरताहेत वरदान
By Admin | Updated: April 8, 2017 00:57 IST2017-04-08T00:57:22+5:302017-04-08T00:57:22+5:30
उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार

रसाळ फळे ठरताहेत वरदान
आरोग्याची काळजी : डॉक्टरांचे फळांच्या सेवनाचे आवाहन, दिल्या आरोग्याच्या टिप्स
सालेकसा : उन्हाळ्याचे दिवस सर्वात जास्त त्रासदायक असतात. या ऋतुमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार व विहारावर विशेष लक्ष तसेच दिनचर्या ठेवणे आवश्यक असते. अशातच उन्हाळ्यात जर रसाळ फळांचे सेवन करीत असल्यास उत्तम आरोग्य टिकवून ठेवण्यात मोठी मदत मिळत असते. यामुळेच उन्हाळ््यात रसाळ फळे आरोग्यासाठी वरदान ठरतात.
ग्रिष्मऋतुमध्ये घाम फुटत असल्याने सतत शरीरातून पाणी बाहेर निघत असते. त्याबरोबर अशक्ततपणा, थकवा वाटणे इत्यादी प्रक्रिया सतत घडत असतात. अशात पाण्याचे भरपूर सेवन तसेच फळांचा रस, निंबू पानी, शरबत, पन्हे इत्यादी शरीराला देत राहिल्यास शरीरात स्फुर्ती व ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत मिळते. प्रकृती मनुष्याची सर्वात मोठी काळजी वाहक असून कोणकोणत्या ऋतुमध्ये कोणकोणती फळे उपयोगी असतात याला अनुसरुन फळे उपलब्ध होतात. म्हणून ऋतुफळे जास्त सेवन करायला हवे.
उन्हाळ्यात द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा, अननस, डाळींब, निंबू इत्यादी फळे शरीराला मोठे वरदान असून या फळांचा रस नियमीत पिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आरोग्य ठणठणीत ठेवण्यात मदत मिळते. भोजनात सुद्धा रसाळ भाजी प्रकार किंवा पालेभाज्या सेवन केल्यास पचायला हलक्या व आरोग्यवर्धक असतात.
टमाटर मध्ये द्रव्य रुप जास्त असून विविध स्वरुपात टमाटरचे नित्यसेवन फार उपयोगी असते. त्याच बरोबर काकडी, दूधी भोपळा, दोडके इत्यादी भाजी प्रकार हलके व पाचक असतात.
प्रकृती आणि ऋतुचा नेहमी घट्ट संबंध असतो. आरोग्य टिकवून ठेवण्यास हे समजून घेणे आवश्यक असते. शरीराची पाचनसंस्था जठराग्नी बाहेरच्या थंडी आणि गरमीला अनुसरुन स्वत:त बदल करीत असते. (तालुका प्रतिनिधी)
ऋतुुनुसार अशी असते पचनसंस्था
ठंडीच्या दिवसात बाहेरचे वातावरण खूप गार असते. शरीराची पाचनसंस्था उष्ण असते. अशात उष्ण जढराग्नी कोणतेही भोजन पचवून घेण्यात सक्षम असते. त्यामुळे जड पदार्थ सुद्धा पचन्यास मदत मिळते. म्हणून शरीराच्या आतील भाग उष्ण ठेवण्यासाठी ठंडीच्या दिवसात उष्ण पदार्थावर गरम पेय पदार्थ प्राशन करने हितकारक असते. म्हणूनच ठंडीच्या दिवसात चिकन, मटन, अंडीसोबत गरम सूप, कॉफी, चहा खूप उपयोगी ठरतात. उन्हाळ्यात शरीराची प्रकृती विपरित झालेली असते. रनरनत्या उन्हात जड व उष्ण आहारांचे सेवन करने आरोग्यासाठी धोकादायक असून या मोसमात रसाळ ऋतृू फळे त्याचबरोबर ठंड पेय जास्त उपयोगी ठरते. बाहेर उन्हाळा वाढल्यास शरीराच्या आत पाचनसंस्था ठंड व कमजोर झालेली असते. अशात जड वस्तू किंवा तळलेले पदार्थ व उष्ण पदार्थ पचवण्यास कठिण जाते. त्यामुळे मलमुत्र योग्यप्रकारे उत्सर्जीत होत नाही व आरोग्यावर वाईट परिणाम घडण्याची दाट शक्यता असते. अशात भरपूर रस व पाणी असलेल्या फळांचे सेवन उत्तम व आरोग्यदायक असते.