मनरेगाच्या कामावर बोगस मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:53 IST2019-03-15T21:53:08+5:302019-03-15T21:53:27+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातील मुरपार राम येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गट क्र. ३७४ मध्ये तलाव खोलीकरणाचे काम ग्रा.पं. कार्यालयांतर्गत करण्यात येत आहे. मात्र या कामावर बोगस मजूर दाखविल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

मनरेगाच्या कामावर बोगस मजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील मुरपार राम येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गट क्र. ३७४ मध्ये तलाव खोलीकरणाचे काम ग्रा.पं. कार्यालयांतर्गत करण्यात येत आहे. मात्र या कामावर बोगस मजूर दाखविल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच याची खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
मनरेगाच्या कामावर गावातील पंधरा मजूर कामावर न नसताना सुध्दा येथील रोजगार सेवकाने त्यांची हजेरी लावल्याची चाहूल गावकºयांना लागली. यानंतर त्यांनी १ मार्चला पंचायत समिती सडक अर्जुनी येथील खंडविकास अधिखकारी व २ मार्चला उपजिल्हाधिकारी गोंदिया यांना तक्रार केली. त्यानंतर १४ मार्चला पं.स. सडक अर्जुनी येथील विस्तार अधिकारी एम.एस.खुने यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चौकशीला सुरुवात केली. त्या चौकशी दरम्यान धनलाल शिवलाल चौधरी (६८) हा व्यक्ती गवंडी कामावर जातो. मात्र त्या व्यक्तीचे नाव तलाव खोलीकरणाच्या हजेरी पत्रकावर नाव लिहिलेले आहे. तो व्यक्ती श्रावणबाळ योजनेचा लाभार्थी असून दर महिन्याला मानधनाची उचल करतो. दुसरे नाव रोजगार सेवकाच्या पत्नीचे असून एकही दिवस कामावर न येता हजेरी पटावर नाव लिहिले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये यावरुन चांगलाच गदारोळ झाला. जो मजूर कामावर जात असून त्याची रोजंदारी कमी व घरी राहणाºया व्यक्तीची काम न करता मोबदला जास्त असा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे गावकºयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असता एम.एस.खुणे यांनी मध्येच चौकशी थांबविल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. मुरमार राम येथील तलाव खोलीकरणाची चौकशी करण्याची मागणी उपेंद्र बोपचे, उपसरपंच सुदेश फुल्लूके, रविंद्र पटले, भिमराव पटले, चौकलाल चौधरी, ध्रुवराज बोपचे, कैलास बोपचे, सेवकराम पटले, दिनेश चौधरी यांनी केली आहे.