गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहितेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST2021-02-23T04:45:39+5:302021-02-23T04:45:39+5:30

गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चांदणीटोला नागरा येथील एका विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत स्वत:च्या घरीच आढळला. तिने ...

The body of the married woman was found strangled | गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहितेचा मृतदेह आढळला

गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहितेचा मृतदेह आढळला

गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चांदणीटोला नागरा येथील एका विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत स्वत:च्या घरीच आढळला. तिने आत्महत्या केली, असे सासरचे, तर तिचा घातपात झाला, असे माहेरच्या लोकांचे म्हणणे आहे. मीरा कमलेश साठवणे (वय २६, रा. चांदणीटोला) असे मृत महिलेचे नाव आहे.

सोमवारी (दि. २२) सकाळी ६.३० वाजता स्वत:च्या घरी स्वयंपाक खोलीत लोखंडी आड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मीराचा मृतदेह आढळला. मागील तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न फिर्यादी कमलेश गेंदलाल साठवणे (वय २७) याच्यासोबत झाले होते. मीराला दोन वर्षाचा एक मुलगा आहे. तिने आत्महत्या केली, तर तिच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे. आत्महत्या नाही, तर तिचा घातपात कुणी केला, या दोन्ही बाजूने गोंदिया ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी या घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस हवालदार अन्ना ब्राम्हणकर करीत आहेत.

Web Title: The body of the married woman was found strangled