पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह मिळाला

By Admin | Updated: September 28, 2015 01:58 IST2015-09-28T01:58:27+5:302015-09-28T01:58:27+5:30

केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अल्सर या पोटाच्या आजाराने ग्रस्त रूग्णाला औषधोपचारासाठी शुक्रवारी (दि.२५) रात्री दाखल करण्यात आले होते,

The body of the deceased was found | पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह मिळाला

पळून गेलेल्या रूग्णाचा मृतदेह मिळाला

गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अल्सर या पोटाच्या आजाराने ग्रस्त रूग्णाला औषधोपचारासाठी शुक्रवारी (दि.२५) रात्री दाखल करण्यात आले होते, मात्र काही वेळातच तो नजर चुकवून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सिव्हील लाईन परिसरातील एका हॉटेलसमोर त्याचा मृतदेहच आढळला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही.
जितेंद्र नरेंद्र बागडे (३३) रा.छोटा गोंदिया असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याला केटीएस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ११.३० वाजता त्याचे नातेवाईक त्याला पाहण्यासाठी रूग्णालयात आल्यावर तो आपल्या बेडवर नव्हता. सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो कुठेही आढळला नाही. शनिवारी (दि.२६) जितेंद्रचा मृतदेह सिव्हील लाईन परिसरातील हॉटेलसमोर आढळल्याने परिसरात खळबळ माजली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणात जितेंद्रच्या कुटुंबीयांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. अशीच एक घटना मागील वर्षी केटीएस रूग्णालयात घडली होती. केटीएस रूग्णालयातून पळून गेलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह नागरा येथील तलावात आढळला होता.

Web Title: The body of the deceased was found