३५ वर्षांनंतर सिलेझरीत भाजपचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST2021-01-21T04:27:06+5:302021-01-21T04:27:06+5:30
सिलेझरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत ९ पैकी ९ उमेदवार निवडून आले. तब्बल ३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे ...

३५ वर्षांनंतर सिलेझरीत भाजपचा पराभव
सिलेझरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत ९ पैकी ९ उमेदवार निवडून आले. तब्बल ३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. या निवडणुकीत सुखदेव, विश्वनाथ मेंढे, दर्शना मोरेश्वर गणवीर, आत्माराम बिसन गोपे, सुनीता युवराज ब्राम्हणकर, हेमराज भाष्कर नहामुर्ते, छाया सुरेश मेश्राम, राजकुमार रामदास शहारे, लता दिनेश मेंढे, शिल्पा भरत हेमने हे विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांना तहसील कार्यालयात तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी विनोद मेश्राम, नायब तहसीलदार के. एन. वाढई, निवडणूक निर्णय अधिकारी, डी. टी. शिंदे, साहाय्यक निवडणूक अधिकारी आर. एम. चौधरी यांच्या सोबत राष्ट्रवादी पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष तथा सिलेझरीचे माजी सरपंच डॉ. धार्मिक गणवीर, पी. एस. नंदेश्वर, युवराज ब्राम्हणकर यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.