भाजपची बुथ कमिटी बैठक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:04+5:302021-02-06T04:54:04+5:30
आमगाव : भारतीय जनता पक्षाकडून गुरुवारी (दि. ४) घेण्यात आलेली बुथ कमिटी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार ...

भाजपची बुथ कमिटी बैठक उत्साहात
आमगाव : भारतीय जनता पक्षाकडून गुरुवारी (दि. ४) घेण्यात आलेली बुथ कमिटी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार डॉ. परिणय फुके, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष केशव मानकर, वीरेंद्र अंजनकर, रमेश कुथे, अरविंद शहापूरकर, संजय पुराम, संजय कुळकर्णी, दिनेश दादरीवाल, किशोर हलाणी, भावना कदम, संजय टेंभरे, लायकराम भेंडारकर, उमेश ढेंगे, ओम कटरे, शंकर मडावी, धनवंत वट्टी उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. फुके यांनी सर्वांनी एकदिलाने काम करून गावातील प्रत्येकाच्या समस्या शासनदरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून भाजप सामान्य नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन त्यांच्यासोबत आहे, असे त्यांच्या मनात रुजायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.