त्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी भाजप स्वीकारणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST2021-06-01T04:22:16+5:302021-06-01T04:22:16+5:30

केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला सात वर्षे झाल्यानिमित्त कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ...

BJP will take responsibility for the care of those children () | त्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी भाजप स्वीकारणार ()

त्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी भाजप स्वीकारणार ()

केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला सात वर्षे झाल्यानिमित्त कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची सेवा केली. त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते डॉ. हिंमत मेश्राम, डॉ. कांचन रहांगडाले, डॉ. शिवकुमार हरिणखेडे, डॉ. आदित्य, अर्चना कांबळे, सुनीता साखरवाडे, मीना, छबीता भगत, कुरेशी, रिना रहांगडाले, परिहार, चौधरी, शारदा कटकवार, रेखा टेंभरे, आर. एस. क्षीरसागर व पारधी आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सोनाली देशंपाडे, महामंत्री मदन पटले, भाजपा तालुकाध्यक्ष

भाऊराव कठाणे, सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार चत्रभुज बिसेन, डॉ. बसंत भगत, सरपंच कमलेश आतिलकर, राजेश रहांगडाले, मनोहर बुद्धे, पत्रकार हुपराज जमईवार, तोरमलाल सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल मोहने यांनी केले. संचालन एस.एन. सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ. शिवकुमार हरिणखेडे यांनी मानले.

Web Title: BJP will take responsibility for the care of those children ()