शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी/मोरगावात भाजपने गड राखला

By admin | Updated: October 19, 2014 23:39 IST

अर्जुनी/मोरगाव विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले यांनी विजय संपादन करून भाजपक्षाचा गड राखला. त्यांनी काँग्रेस उमेदवार राजेश नंदागवळी यांचा तब्बल ३० हजाराच्या मताधिक्यांनी पराभव केला.

अर्जुनी/मोरगाव : अर्जुनी/मोरगाव विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले यांनी विजय संपादन करून भाजपक्षाचा गड राखला. त्यांनी काँग्रेस उमेदवार राजेश नंदागवळी यांचा तब्बल ३० हजाराच्या मताधिक्यांनी पराभव केला. या मतदारसंघात तब्बल १ हजार ५२८ मतदारांनी नकारात्मक मताचा वापर केला. आज रविवारी सकाळी ८वाजता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मतमोजणीला सुरुवात झाली. अगदी पहिल्या फेरीपासूनच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटच्या २२ व्या फेरीपर्यंत कायम राखली. काँग्रेसचे उमेदवार राजेश नंदागवळी व राष्ट्रवादीचे मनोहरराव चंद्रीकापुरे यांचेत फेरीनिहाय दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस दिसून आली. सुरुवातीच्या २ फेऱ्यात भाजपखालोखाल दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस दिसून आली. सुरुवातीच्या २ फेऱ्यात भाजपखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला मते मिळाली. तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आघाडी घेतली. परत ४ व ५ व्या फेरीत काँग्रेसने आघाडी घेतली. फेरी क्र. ६ ते १३ पर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने दुसरा क्रमांक राखला. मात्र १४ व्या फेरीत परत काँग्रेस उमेदवाराने आघाडी घेऊन ही आघाडी शेवटच्या २२ व्या फेरीपर्यंत कायम राखली. अखेर राजकुमार बडोले यांना ३० हजार २९५ मतांची आघाडी मिळाली. विजय घोषीत होताच कृषी उत्पन्न बाजार समितीतून गावातील प्रमुख मार्गाने विजयी मिरवणूक काढण्यात आली. राजकुमार बडोले यांनी हात जोडून मतदारांप्रती आभार व्यक्त केले. ही निवडणुक यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता निवडणुक निरीक्षक गौतमसिंग यांचे नेतृत्वात निवडणुक निर्णय अधिकारी डी.एम.मनकवडे, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी संतोष महाले, सडक अर्जुनीचे तहसीलदार एन.जे. उईके, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी मोलाची भूमिका बजावली. या मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त पाळण्यात आला. दुचाकी व चारचाकी वाहने मतमोजणी केंद्रापासून सुमारे एक ते दीड किमी अंतरावरच थांबविण्यात आली होती.