अर्जुनी तालुक्यात भाजपला खिंडार

By Admin | Updated: June 14, 2015 01:52 IST2015-06-14T01:52:03+5:302015-06-14T01:52:03+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील युवा नेते व पंचायत समिती सदस्य किशोर तरोणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

BJP in Arjuni taluka Khindar | अर्जुनी तालुक्यात भाजपला खिंडार

अर्जुनी तालुक्यात भाजपला खिंडार

किशोर तरोणे राष्ट्रवादीत : कदर केली नसल्याचा आरोप
गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील युवा नेते व पंचायत समिती सदस्य किशोर तरोणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खा.पटेल व आ.राजेंद्र जैन यांच्या विकास कामांमुळे आपण राष्ट्रवादीसोबत जात असून भाजपामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांची कोणतीही कदर नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, राकाँ नेते उद्धव मेहेंदडे, जिल्हा बँक संचालक राजकुमार एन.जैन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिन्ह देऊन स्वागत केले.

Web Title: BJP in Arjuni taluka Khindar