भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:26+5:30
राज्यात नेमके स्थित सरकार भाजप देणार की महाविकास आघाडी यावरुन चर्चा सुरु होती. तर शुक्रवारी महाविकास आघाडीने सत्तास्थापनेची तयारी पूर्ण केली असतानाच शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अचानक झालेल्या या शपथविधीने अनेकांना हादरा बसला. तर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.२३) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर संपूर्ण जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मिठाई वाटून तोंड गोड करुन शुभेच्छा दिल्या. जयस्तंभ चौकात आतिशबाजी करून भारतीय जनता पार्टीचा विजय असो व ‘भारत माता की जय’चे नारे दिले.
या वेळी प्रामुख्याने माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आ.रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेतराम कटरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, दिपक कदम, दिनेश दादरीवाल, मनोहर आसवानी, शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा संर्पक प्रमुख संजय कुलकर्णी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, मिनू बडगुजर,अशोक हरिणखेडे, गणेश हेमणे, प्रदिपसिंह ठाकूर, शंभुशरणसिंह ठाकूर, रमेश दलदले, राजेश चतुर, जीवन जगणित, नगरसेवक दिलीप गोपलानी, हेमलता पतेह, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री ऋषीकांत साहू, कुणाल बिसेन, नरेंद्र तुरकर, मुजीब पठान, चैतन्य सोनछात्रा, सतीश मेश्राम, अमित झा, संजय मुरकुटे, शहर महामंत्री बाबा बिसेन, मुकेश चन्ने, अशोक जयसिंघानी, राजा कदम, दिपल अग्रवाल, विन्नी गुलाटी, अजिंक्य इंगळे, बंटी शर्मा, कमलजित सिंग, गणेश जाधव, श्रीकांत चांदूरकर, रितेश जायस्वाल, मंगलेश गिरी, प्रवीण पटले, देवेंद्र अग्रवाल, संकेश तिवारी, रामेश्वर लिल्हारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्टÑातील सत्ता स्थापनेचा पेच मागील महिनाभरापासून कायम होता.
राज्यात नेमके स्थित सरकार भाजप देणार की महाविकास आघाडी यावरुन चर्चा सुरु होती. तर शुक्रवारी महाविकास आघाडीने सत्तास्थापनेची तयारी पूर्ण केली असतानाच शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अचानक झालेल्या या शपथविधीने अनेकांना हादरा बसला. तर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यानी या निणर्याचे स्वागत जल्लोष साजरा केला.