शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेतून बिरसी विमानतळ करणार २५ लाखांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून येथील रेल्वे स्थानकावर सुध्दा सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जात आहे. यामुळे महिन्याकाठी लाखो रुपयांचा विजेवर होणार खर्च वाचविण्यास रेल्वे प्रशासनाला मदत झाली. तर शासनाकडून सुध्दा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सवलत दिली जात आहे.

ठळक मुद्दे१६० केव्हीचा सौर प्रकल्प : विजेची बचत करण्यासाठी पाऊल,वरिष्ठांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या अनेक शासकीय कार्यालयांचा कल सौर ऊर्जेकडे वाढला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची बचत करणे देखील शक्य आहे. याच दृष्टीकोनातून गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाने १६० केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे विमानतळ प्राधिकरणाला वर्षाकाठी २५ ते ३० लाख रुपयांची बचत करणे शक्य होणार आहे.हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून येथील रेल्वे स्थानकावर सुध्दा सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जात आहे. यामुळे महिन्याकाठी लाखो रुपयांचा विजेवर होणार खर्च वाचविण्यास रेल्वे प्रशासनाला मदत झाली. तर शासनाकडून सुध्दा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सवलत दिली जात आहे. शिवाय सौर ऊर्जेचे अनेक फायदे असून अतिरिक्त वीज सुध्दा विद्युत वितरण कंपनीला विकणे शक्य आहे. याच पावलावर पाऊल ठेवित बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाचे सौरऊर्जेपासून वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेत १६० केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विमानतळाच्या परिसरात उभारला आहे.या सौर प्रकल्पाचे नुकतेच क्षेत्रीय संचालक जी.चंद्रमोली यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बिरसी विमानतळावर दररोेज एअर ट्राफिक कंट्रोल युनिटसाठी दर महिन्याला लाखो रुपयांची वीज लागत होती. जवळपास वर्षाकाठी वीज बिलापोटी विमानतळ प्राधिकरणाला २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च करावा लागत होता.या खर्चाची बचत करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. बिरसी विमानतळ परिसरात १६० केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पातून दररोज ८५० युनीट विजेचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे विमानतळ प्राधिकरणाची महिन्याकाठी २५ ते ३० लाख रुपयांनी बचत झाली आहे.या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी विभागीय संचालक चंद्रमोळी यांच्यासोबत महाव्यवस्थापक जी.मनिष, विमानतळ प्राधिकरणाचे सचिन खंगार, सहायक व्यवस्थापक पकंज वंजारी व वरिष्ठ अधिकारी बुधवारी बिरसी येथे आले होते. 

टॅग्स :Airportविमानतळ