भोयर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST2021-01-10T04:21:41+5:302021-01-10T04:21:41+5:30

अध्यक्षस्थानी संस्था सचिव बबनसिंह ठाकूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी भोयर, प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे, प्राचार्य अनिल मुरकुटे, प्राचार्य ...

Bhoyar felicitated on his retirement | भोयर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

भोयर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

अध्यक्षस्थानी संस्था सचिव बबनसिंह ठाकूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी भोयर, प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे, प्राचार्य अनिल मुरकुटे, प्राचार्य भरत ताजने उपस्थित होते. माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भोयर यांना शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी ठाकूर यांनी, अधिकारी-कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी नियुक्त केलेले असतात; मात्र प्रामाणिकपणे सेवा देणारेच अधिकारी अधिक लोकप्रिय होतात. त्यातले एक अधिकारी म्हणजे भोयर असल्याचे गौरवोद्गार काढले. प्राचार्य मुरकुटे, प्राचार्य ताजने यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य टेंभुर्णे यांनी केले. संचालन प्रा. सुनील सातोकर यांनी केले. आभार प्रा. मिलिंद हाडोळे यांनी मानले.

Web Title: Bhoyar felicitated on his retirement