विमा योजनेचा ९० लाभार्थ्यांना लाभ
By Admin | Updated: July 16, 2014 00:16 IST2014-07-16T00:16:47+5:302014-07-16T00:16:47+5:30
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्याकरिता आम आदमी विमा योजना २ आॅक्टोबर २००६ पासून राबविण्यास सुरुवात केली. भारतीय

विमा योजनेचा ९० लाभार्थ्यांना लाभ
सालेकसा : महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्याकरिता आम आदमी विमा योजना २ आॅक्टोबर २००६ पासून राबविण्यास सुरुवात केली. भारतीय आयुर्विमा महामंडाकडून लाभार्थ्यांचा विमा उतरण्यात येतो व विम्याची रक्कम शासनाकडून भरण्यात येते. यासाठी ग्रामीण भागातील भूमिहिन कुटुंबातील १६ ते ५९ वयोगटातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख मात्र राहू शकतो.
सालेकसा तालुक्यात सन २०११-१२ ला २ हजार २५७, २०१२-१३ ला ६ हयार ०८६, सन २०१३-१४ ला ५ हजार ०६१ नागरिकांनी आम आदमी विमा योजनेचे अर्ज भरले. आतापर्यंत १४ हजार ४०४ नागरिकांचे अर्ज आॅनलाईन तहसील कार्यालयामार्फत भरण्यात आली.
यापैकी सन २०११-१२ ला २२ व्यक्ती, २०१२-१३ ला १४ व्यक्ती सन २०१३-१४ ला ४९ व्यक्तींचा नैसर्गिक मृत्यू झाला तर अपघातात ५ व्यक्ती मरण पावले. या मृत व्यक्तींना सन २०११-१२ मध्ये ६ लाख ६० हजार रुपये, २०१२-१३ मध्ये ४ लाख २० हजार रुपये व २०१३-१४ मध्ये १४ लाख ७० हजार रुपयांची रक्कम विम्यांतर्गत मृतकाच्या नातेवाईकांना देण्यात आली.
अपघाती मृतकांना ३ लाख ७५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. या आम आदमी विमा योजनेपासून सालेकसा तालुक्यातील अनेक गावातील नागरिक अजूनही वंचित आहेत.
त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी अर्ज भरले त्यांचे वय ५९ वर्षाचे झाल्यावर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक अर्ज रद्द झालेले आहे.या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार खापेकर, नायब तहसीलदार आर.टी. लांजेवार यांनी नागरिकांना केले आहे. (तालुका प्रतिनिधी)