जिल्ह्याच्या बेरोजगार युवक-युवतींना लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST2021-09-17T04:35:04+5:302021-09-17T04:35:04+5:30

गोंदिया : जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अमितकुमार भालेराव यांनी महात्मा फुले अनुसूचित जाती विकास महामंडळमार्फत एन.एस.एफ.डी.सी चे ...

Benefit the unemployed youth of the district | जिल्ह्याच्या बेरोजगार युवक-युवतींना लाभ द्या

जिल्ह्याच्या बेरोजगार युवक-युवतींना लाभ द्या

गोंदिया : जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अमितकुमार भालेराव यांनी महात्मा फुले अनुसूचित जाती विकास महामंडळमार्फत एन.एस.एफ.डी.सी चे प्रकरण त्वरित मार्गी लावा, यासाठी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना निवेदन दिले.

या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवक-युवतींना नवीन रोजगार सुरू करण्यासाठी कर्ज देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यात २०० बेरोजगार युवक-युवतींना कर्ज मंजूर झाले आहे. तरी देखील त्यांना आतापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले नाही. परिणामी आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे कर्ज २०१८-१९ मध्ये मंजूर झाले आहे. त्यावेळी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते. जिल्ह्यातील युवकांना कर्ज मिळाले नाही. भाजपने अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवक-युवतींची दिशाभूल केल्याचा आरोप माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केला आहे. शिष्टमंडळात माजी आमदार दिलीप बंसोड, अशोक (गप्पू) गुप्ता, किसान काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, सचिव राजू काळे, राजीव ठकरेले, अजय राहंगडाले, राजकुमार पटले, शहर अध्यक्ष अमर राहुल, पंकज चौधरी यांचा समावेश होता.

Web Title: Benefit the unemployed youth of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.