अनुदानाअभावी लाभार्थी झाले निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:11+5:302021-01-13T05:16:11+5:30

नाल्यावरील पुलाची उंची वाढवा सोनपुरी : सोनपुरी ते बोदरा साकोली मार्गावरील सोनपुरी मारबद नाल्यावरील पुलाची उंची खूपच कमी ...

Beneficiaries became destitute due to lack of grants | अनुदानाअभावी लाभार्थी झाले निराधार

अनुदानाअभावी लाभार्थी झाले निराधार

नाल्यावरील पुलाची

उंची वाढवा

सोनपुरी : सोनपुरी ते बोदरा साकोली मार्गावरील सोनपुरी मारबद नाल्यावरील पुलाची उंची खूपच कमी असल्यामुळे या मार्गावर पावसाळ्यामध्ये सतत पाणी राहात असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते.

रस्त्यावरील जनावरांमुळे नागरिक त्रस्त

आमगाव : तालुक्यातील ग्राम माल्ही येथे रस्त्यावर नागरिक जनावरे बांधत असल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने जनावरे बांधणाऱ्यांना तंबी द्यावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत. तसेच ट्रॅक्टर चालक आपले वाहन रस्त्यावर उभे करीत असल्याने ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

अतिक्रमण काढण्याची मागणी

गोंदिया : शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करणे कठीण जात आहे. परिणामी नाल्यात कचरा साचून नाल्या जाम झाल्या आहेत. सांडपाण्यामुळे त्यातून दुर्गंधी सुटत आहे. नगर परिषदेने लक्ष देत नाल्यांवरील अतिक्रमण काढणे गरजेचे झाले असल्याचे नागरिक बोलत आहेत.

सुशिक्षित बेरोजगारांमध्ये वाढ

नवेगावबांध : जिल्ह्याच्या विकासाकडे जनप्रतिनिधी लक्ष घालत असल्याचे बोलले जात असले तरी जिल्ह्यात आजही रोजगाराचा प्रश्न कायम आहे. परिणामी जिल्ह्यात दिवसेंदिवस बेरोजगारांची फौज तयार होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात रोजगार नसल्याने या बेरोजगारांना बाहेरची वाट धरावी लागत आहे.

रस्त्यांची झाली दयनीय अवस्था

परसवाडा : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागांंतर्गत येत असलेल्या ग्राम परसवाडा, बोरा, डब्बेटोला, बेरडीपार, पिपरिया, चांदोरी खुर्द, खैरलांजी, पिपरिया, अर्जुनी, बिहिरिया, इंदोरा, चांदोरी रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अशातही विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. हे रस्ते पूर्णपणे उखडले असून, त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याने धड चालताही येत नाही. कित्येकदा अपघात झाले आहेत. पण, अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी कधीही लक्ष दिले नाही.

Web Title: Beneficiaries became destitute due to lack of grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.