मोफत सेवा असल्याने आम आदमी विमा योजनेकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: August 6, 2014 23:54 IST2014-08-06T23:54:59+5:302014-08-06T23:54:59+5:30
राज्य आणि केंद्र सरकारने लोकोपयोगी आणि जनहितैशी विविध योजना आखल्या त्या खरचं कौतुकास्पद आहेत. या योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय असल्याचे

मोफत सेवा असल्याने आम आदमी विमा योजनेकडे दुर्लक्ष
काचेवानी : राज्य आणि केंद्र सरकारने लोकोपयोगी आणि जनहितैशी विविध योजना आखल्या त्या खरचं कौतुकास्पद आहेत. या योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय असल्याचे चित्र सर्वदूर आहे. मात्र ज्या योजनांमध्ये मोफत सेवा दिली जाते त्यापासून दलाल चारहात दूत राहतात. असाच प्रकार आम आदमी विमा योजनेसंबंधी असल्याने या योजनेकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आम आदमी विमा योजना ही गरीब वर्गाकरिता दु:ख हरण करणारी अशी महत्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील संपूर्ण लाभ योग्य व्यक्तिला द्यायला पाहिजे. परंतु ही योजना मोफत सेवा स्वरुपाची असल्याने याकडे सर्वाचे दुर्लक्ष आहे.
आम आदमी विमा योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्याची निश्चित मर्यादा नाही. या योजनेची रक्कम शासनाला भरायची आहे. त्यामुळे आवेदन करताना आर्थिक घेवान-देवान नसल्याने कामे करणाऱ्यांना नगद आड कमाई मिळण्याची शक्यता मुळीच नाही. त्या कारणाने या योजनेकडे दलालची सक्रीयता दिसून येत नाही.
तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांनी किंवा सेवाभावी संस्थेने स्वत:हून आम आदमी विमा योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा असे प्रयत्न केले नसल्याची माहिती नागरिकांनी लोकमतला दिली आहे.
या योजनेत अधिकतर लाभांश मृत्यूनंतर आहेत. कोणाची मृत्यू कधी होणार याची निश्चिती नाही. त्यामुळे शेतकरी किंवा गरीब व्यक्ती कामे करणाऱ्यांना जवळून चायपाण्याचा खर्च द्यायला तयार नाहीत. दलालापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना आड मिळकत कुठून येणार याकडे सर्वाधिक लक्ष असते. मात्र आमआदमी विमा योजना या सर्वांना मोफत सेवा असल्याचे दिसून येते. मोफत सेवेत आपला वेळ कशाला करीता गमवायचा अशी भावना या भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांत असल्याने शासनाच्या महत्वाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचू शकत नाहीत.