मिशन इंद्रधनुष्यला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:31+5:30

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माने म्हणाले, एच.आय.व्ही.एड्सचे प्रतिबंधनात्मक दृष्टिकोनातून जनतेमध्ये असलेले गैरसमज व उपाययोजना याकरीता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राद्वारे सर्व शासकीय रुग्णालयात एड्स बाधित रुग्णांना मोफत उपचार सल्ला व नि:शुल्क चाचणी करण्यात येते.

Beginning of the mission rainbow | मिशन इंद्रधनुष्यला सुरूवात

मिशन इंद्रधनुष्यला सुरूवात

Next
ठळक मुद्देगर्भवती महिलांना पाच हजार रुपयांचे अनुदान : शासनाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रु ग्णालयाच्या प्रांगणात विशेष मिशन इंद्रधनुष्य,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्ताह आणि जागतिक एड्स दिन कार्यक्र माचे उद्घाटन सोमवारी (दि.२) करण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.बी.दुधे, न्या.एम.आर.वानखेडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज राऊत, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.नितीन कापसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी वानखेडे, जिल्हा कार्यक्र म समन्वयक कैलास खांडेकर, जिल्हा पर्यवेक्षक संजय जेनेकर उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माने म्हणाले, एच.आय.व्ही.एड्सचे प्रतिबंधनात्मक दृष्टिकोनातून जनतेमध्ये असलेले गैरसमज व उपाययोजना याकरीता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राद्वारे सर्व शासकीय रुग्णालयात एड्स बाधित रुग्णांना मोफत उपचार सल्ला व नि:शुल्क चाचणी करण्यात येते. जनतेने न घाबरता ए.आर.टी.औषधोपचार घेतल्यास एच.आय.व्ही.बाधित व्यक्ती सामान्य जीवन जगू शकतो. डॉ. दयानिधी म्हणाले, विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत पालकांनी संपूर्ण लसीकरण करून घ्यावे. या मोहिमेअंतर्गत २ डिसेंबरपासून मार्च अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत अर्धवट लसीकरण व लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन नियमित लसीकरणा व्यतिरिक्त अतिरिक्त सत्र लावून संपूर्ण लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
डॉ. निमगडे म्हणाले, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील मातांना शासनाकडून टप्प्याटप्प्याने त्यांचे आधार सीड बँक खात्यात पाच हजार रु पये आर्थिक लाभ देण्यात येतो. सर्व गरोदर मातांनी बँकेमध्ये आपल्या नावाचे खाते उघडून घ्यावी,जेणेकरून सदर वेळेस त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. २ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्ताह राबविण्यात येणार आहे.
यामध्ये जिल्ह्यातील सर्व पहिल्या टप्प्यातील मातांना टप्प्याटप्प्याने ५ हजार रु पये लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक आशामार्फत कमीत कमी पाच नवीन नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.प्रारंभी हिरवी झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम २.० अंतर्गत जिल्ह्यातील अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत शोध घेऊन अतिरिक्त सत्र लावून बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: Beginning of the mission rainbow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.