सोन्याचा मोह आवरेना

By Admin | Updated: February 7, 2015 01:00 IST2015-02-07T01:00:54+5:302015-02-07T01:00:54+5:30

सख्खे नातेवाईक आर्थिक अडचणीत मदत करणार नाही. मात्र तुमच्याकडील सोने तुमची साथ देणार, असे नेहमी म्हटले जाते. जीवनातील ही एक वास्तवीकता आहे.

The beauty of gold | सोन्याचा मोह आवरेना

सोन्याचा मोह आवरेना

गोंदिया : सख्खे नातेवाईक आर्थिक अडचणीत मदत करणार नाही. मात्र तुमच्याकडील सोने तुमची साथ देणार, असे नेहमी म्हटले जाते. जीवनातील ही एक वास्तवीकता आहे. यामुळेच दाखविण्यासाठी व अडीअडचणीत मदतीसाठी संपत्ती म्हणून नागरिकांकडून सोन्याची खरेदी केली जाते. परंतू अलिकडे सोन्याचा दर चढतच नसल्यामुळे गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्यांचा कल बदलला आहे. तरीही सोन्याचे उतरलेले भाव पाहून मध्यमवर्गीयांकडून सोन्याची बारोमास खरेदी केली जात असल्याचे बाजारातील चित्र आहे.
सन २०१३ मध्ये ३४ हजारांची उंची गाठणारे सोने आज २८ हजारांच्या घरात आले आहे. मागील वर्षी तर २५ हजारांची घसरण सोन्याला बघावी लागली होती. एखाद्या वस्तूचे भाव उतरल्यास त्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते व नागरिक जोमात खरेदी करतात. सोन्याच्या बाबतीत तसला प्रकार घडत नाही. सोन्याचे भाव उतरल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असे वाटत होते. मात्र सोन्याचा व्यवहार होता तसाच सुरू आहे. सोन्याच्या व्यवहारातील वैशिष्ट असे की, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी भाव उतरणे ही एक खेदाची बाब दिसत आहे.
शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे आज सोने २८ हजारांच्या घरात आले आहे. अशात आपला बजट बघून मध्यमवर्गीयांकडून खरेदीला जोम आला आहे. तसाही मध्यमवर्गीयांचा गट बारोमासी सोन्याची खरेदी करतो असे सराफा व्यवसायी सचिन बरबटे यांनी सांगीतले. अडीपडीत मदतीसाठी पूंजी म्हणून ते सोन्याला बघतात व जमेल तसे सोने खरेदी करून आपली हौस व संपत्ती बनवित असल्याची वास्तवीकता बाजारातील चित्र बघता नजरेत येते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The beauty of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.