शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

गावकऱ्यांनो ‘लय भारी’ व्हा!

By admin | Updated: December 19, 2015 01:51 IST

संपूर्ण राज्यात समुदाय स्वच्छता कॉर्डाची संकल्पना राबविण्यात येत आहे. शौचालय असलेल्या व त्याचा वापर करणाऱ्या ...

प्रीती रामटेके : चिखली येथे समुदाय स्वच्छता कार्ड उपक्रमाचा शुभारंभगोंदिया : संपूर्ण राज्यात समुदाय स्वच्छता कॉर्डाची संकल्पना राबविण्यात येत आहे. शौचालय असलेल्या व त्याचा वापर करणाऱ्या घरांवर हिरव्या रंगाचा ‘लय भारी’ हा कार्ड लावण्यात येत आहे. घरात शौचालय बनवून, त्याचा वापर करून गावकऱ्यांनी ‘लय भारी’ व्हा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या प्रीती रामटेके यांनी केले. तालुक्यातील ‘ आमदार आदर्श गाव चिखली’ येथे समुदाय स्वच्छता कार्ड लावण्याच्या मोहिमेचा गुरुवारला शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी चिखलीचे सरपंच कैलास पटले, उपसरपंच दिलीप क्षीरसागर, तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एच.एस. मानकर, विस्तार अधिकारी सी.एच. गौतम, ग्रामसेवक गिरीष भेलावे, ग्रामपंचायत सदस्य कुलपत रहांगडाले, भूमेश्वर पटले, सरिता तांडेकर, कल्पना हरिणखेडे, स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद गोंदियाचे माहिती शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यावेळी उपस्थित होते.शौचालय घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचा आहे. वृद्ध मातापित्यांसाठी जसा तो सोयीचा आहे, तसाचा महिलांच्या लज्जा रक्षणसाठी सुद्धा त्याची गरज आहे. शिवाय प्रत्येक घरात शौचालय बनले तर संपूर्ण गाव हागणदारीमुक्त होवून अनेक संभाव्य आजारापासून गावकऱ्यांचा बचाव होवू शकतो. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीने शौचालय बनवून आपले गाव आदर्श करावे असे आवाहन याप्रसंगी गटविकास अधिकारी एच.एस. मानकर यांनी केले. समुदाया स्वच्छता कार्डाची संकल्पना वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ठ तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीत राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे समुदाय स्वच्छता प्रगती पत्रक सार्वजनिक ठिकाणात प्रदर्शीत करुन गावातील शौचालय बांधकामाबाबतची एकूणच स्थिती संपूर्ण गावकऱ्यांना कळणार आहे. हा उपक्रम गावकऱ्यांच्या हिताचाच आहे. शिवाय या उपक्रमासह गावात स्वच्छता जागरण मंचाची सुद्धा स्थापना करावयाची आहे. २० कुटुंबामागे एक सक्रिय सदस्य नेमूण गावात वैयक्तिक शौचालय बांधकामाला गती आणावयाची आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी उपक्रमात सहभागी व्हावे असे मत पंचायत समिती विस्तार अधिकारी सी.एच. गौतम यांनी व्यक्त केले. गावाला हागणदारीमुक्त करण्यासह आपला गाव आदर्श करण्यासाठी सर्वतोपरि सहकार्य करण्याची ग्वाही याप्रसंगी सरपंच कैलास पटले यांनी दिली. माहिती, शिक्षण संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी समायोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक गिरीश भेलावे यांनी केले. दरम्यान गावात फेरी काढून स्वच्छता समूदाय कार्ड लावून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चिखली येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का बडवाईक, शिक्षक एल.डी. पटले, अंगणवाडी सेविका गिता रहांगडाले, निशा रहांगडाले, सुधाकर पटले, पुरण पटले, रेवन रंगारी, प्रमिला रहांगडाले, दिलीप भरणे, गटसंसाधन केंद्राचे तालुका समन्वयक संजय राठोड, समूह समन्वयक अनुप रंगारी, सुरेश पटले, छाया बोरकर तथा गावकरी कार्ड लावण्याच्या उपक्रमात सहभागी झाले.(प्रतिनिधी)