सावधान ! जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST2021-01-25T04:30:35+5:302021-01-25T04:30:35+5:30

गोंदिया : नवीन बाधितांचा आकडा आता एक अंकी आल्याने दिलासा मिळाला असतानाच रविवारी (दि. २४) जिल्ह्यात बाधितांची वाढ दिसून ...

Be careful! The number of victims is increasing in the district | सावधान ! जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढतोय

सावधान ! जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढतोय

गोंदिया : नवीन बाधितांचा आकडा आता एक अंकी आल्याने दिलासा मिळाला असतानाच रविवारी (दि. २४) जिल्ह्यात बाधितांची वाढ दिसून आली. रविवारी २१ नवीन बाधितांची नोंद करण्यात आल्याने आकडा पुन्हा वाढत असताना दिसत आहे. मात्र, २८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने तेवढी चिंताजनक बाब नाही. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४११६ एवढी झाली असून, १३८०१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आता १३४ रुग्ण क्रियाशील आहेत.

रविवारी जिल्ह्यात आढळून आलेल्या २१ नवीन बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील १६, आमगाव १, सालेकसा १, देवरी १, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १, तर इतर राज्य व जिल्ह्यातील एक रुग्ण आहे. त्यातच २८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १२, तिरोडा ५, आमगाव ६, सालेकसा ३, देवरी १, तर इतर राज्य व जिल्ह्यातील एक रुग्ण आहे. विशेष म्हणजे, आता जिल्ह्यात १३४ रुग्ण क्रियाशील असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८२, तिरोडा ७, गोरेगाव ६, आमगाव १५, सालेकसा १०, देवरी ४, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील पाच, तर इतर राज्य व जिल्ह्यातील दोन रुग्ण आहेत.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील नवीन बाधितांचा आकडा ७-८ वर आला होता. मात्र, आता अचानकच त्यात वाढ होताना दिसत असून, रविवारी थेट २१ नवीन बाधितांची भर पडल्याने पुन्हा कोरोना डोके वर काढत आहे काय, असा प्रश्न पडत आहे. यामुळे लस आली असली तरी कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलेले चालणार हे यातून दिसून येत आहे. उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्यानेच कोरोनाला हरविता येणार आहे, हे मात्र खरे आहे.

----------------------

चाचण्यांचे प्रमाण वाढविले

रविवारी जिल्ह्यात ७२३ चाचण्यांचा अहवाल प्रलंबित होता. म्हणजेच जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याचे दिसत आहे. आतापर्यंत ६३३६३ आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यात ८३३८ पॉझिटिव्ह, तर ५१०८५ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्याचप्रकारे ६४४१७ रॅपिड ॲंटिजन चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात ६०७० चाचण्या पॉझिटिव्ह, तर ५८३४७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

Web Title: Be careful! The number of victims is increasing in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.