सावधान ! पाच दिवसात ७०० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:01 IST2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:01:07+5:30

जिल्ह्यात शनिवार आढळलेल्या १५९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ९२ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. पाच दिवसात आढळलेल्या सर्वाधिक रुग्णांमध्ये गोंदिया शहरातीलच बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे गोंदिया शहरात कोरोनाचा समूह संसर्ग तर सुरू झाला नाही अशी शंका व्यक्त केली आहे. जिल्हावासीयांनी अधिक सजग होत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे.

Be careful! 700 patients in five days | सावधान ! पाच दिवसात ७०० रुग्ण

सावधान ! पाच दिवसात ७०० रुग्ण

ठळक मुद्दे१५९ कोरोना बाधितांची भर : १ बाधिताचा मृत्यू, ४४ बाधितांनी केली मात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून १ ते ५ सप्टेबर या पाच दिवसात जिल्ह्यात तब्बल ७०० कोरोना बाधित आढळले. ८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्ण वाढीचा वेग तीन आकडी झाला असून जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. शनिवारी (दि.५) १५९ कोरोना बाधित आढळले तर एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. तर ४४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून आता सर्वांनी स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात शनिवार आढळलेल्या १५९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ९२ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. पाच दिवसात आढळलेल्या सर्वाधिक रुग्णांमध्ये गोंदिया शहरातीलच बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे गोंदिया शहरात कोरोनाचा समूह संसर्ग तर सुरू झाला नाही अशी शंका व्यक्त केली आहे. जिल्हावासीयांनी अधिक सजग होत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा दोन हजाराच्या वर गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१८६ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १०१४ कोरोना बाधित अ‍ॅक्टीव्ह आहेत.तर ११४३ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना वेग दुप्पटीवर गेला असताना मात्र आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार रोज पुढे येत आहे. त्यामुळे सुध्दा नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत प्रयोगशाळेत एकूण १८ हजार ६६६ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी २१८६ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर १६०१३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.३७७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. तर ७२१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.
कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात असून यातंर्गत आतापर्यंत १३८९८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १३२०७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ६११ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

शनिवारी आढळलेले बाधित
शनिवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ९२ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. गोंदिया श्रीनगर १, बाजपेई वॉर्ड १, गांधी वॉर्ड १, मामा चौक २, सिव्हील लाईन ५, जिल्हा परिषद १, गंज वॉर्ड १, रिंग रोड ३, कुंभारेनगर १, रामनगर १, बसंतनगर २, टी.बी.टोली १, न्यू लक्ष्मीनगर १, मरारटोली १, कुडवा २, साई मंगलम रेसिडेन्सी १, बिरसोला १, कासा १, सिंधी कॉलनी-३, रेलटोली ८, बाजपाई चौक १, बामनीमोहाडी २, शास्त्री वॉर्ड १, शेठ प्रताप वॉर्ड २, गौतम वॉर्ड २, जनता कॉलनी ३, नेहरु वॉर्ड १, मुर्री १, गौशाला वॉर्ड-१, गणेशनगर ३, फुलचूर १,रतनारा १, बाराखोली १, रामनगर १, आझाद वॉर्ड १,गौरीनगर १, कृष्णपुरा १, श्रीनगर बुध्दविहार ६, गोविंदपूर ४, छोटा गोंदिया २ व गोंदिया येथील १८ रु ग्णांचा समावेश आहे. तिरोडा तालुक्यातील संत कबीर वॉर्ड १ वीर सावरकर वॉर्ड १, ठाणेगाव २, वडेगाव २, तिरोडा १ रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील डोंगरुटोला २, सावरीटोला २, चिचगाव १, पुरगाव १ रुग्ण. आमगाव तालुक्यातील रिसामा ४, सितेपार २, जामखारी ३, ननसरी १, फुक्कीमटा-१,चिरचाळबांध २, आमगाव २, भजेपार १ रुग्ण. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ६, पांढरी ३, लटोरी २ रुग्ण. सडक अर्जुनीमधील एक रुग्ण. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ५,गोठणगाव २, अर्जुनी मोरगाव १ रुग्ण अशा एकूण १५९ रु ग्णांचा समावेश आहे.

Web Title: Be careful! 700 patients in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.