जिल्ह्यात ‘बे मौसम बरसात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:44 IST2019-01-25T22:43:49+5:302019-01-25T22:44:16+5:30
मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळलेले असतानाच शनिवारी (दि.२४) सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र शुक्रवारी (दि.२५) पहाटे दमदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे.

जिल्ह्यात ‘बे मौसम बरसात’
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळलेले असतानाच शनिवारी (दि.२४) सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र शुक्रवारी (दि.२५) पहाटे दमदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत २६४.५० मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ८.०२ एवढी आहे. या ‘बे मौसम बरसात’मुळे मात्र मागील काही दिवसांपासून कमी झालेल्या थंडीचा जोर पुन्ह वाढला आहे.
जिल्ह्यात थंडीचा कमी जोर कमी होत होता. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्याचे वातावरण ढगाळलेले होते. अशात गुरूवारी (दि.२४) पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर शुक्रवारी (दि.२५) पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावून जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. जिल्हयात २६४.५० मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची ८.०२ एवढी सरासरी आहे. विशेष म्हणजे, आमगाव तालुक्यात ६५.२० मीमी. एवढा सर्वाधीक पाऊस बरसला आहे. तर देवरी तालुक्यात ११.२० मीमी. म्हणजेच सर्वात कमी पाऊस बरसल्याची नोंद आहे.
या अवकाळी पावसामुळे शहरातील स्वच्छतेची पोलखोल झाली. शहरातील रेल्वे स्टेशन लगत रस्त्यावर नालीतील घाण रस्त्यावर आल्याने नागरिकांनी त्या चिखलातूनच ये-जा करावी लागली. याशिवाय या पावसामुळे धान खरेदी केंद्रांवर बाहेर पडून असलेल्या धानाला नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आदिवासी महामंडळाचे धान उघडयावर पडून राहत असल्याने पूर्वीच ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आल्याचे महामंडळाचे अधिकारी सुरेश आंबटकर यांनी सांगीतले. तर सोबतच जिल्ह्यातील पिकांना या पावसामुळे फटका बसण्याची शक्यचाही नाकारता येत नाही.