मलेरियाला आमंत्रण देते बनगावचे उपकेंद्र
By Admin | Updated: June 28, 2014 01:11 IST2014-06-28T01:11:03+5:302014-06-28T01:11:03+5:30
आमगाव तालुक्यात रुग्णांना सुलभतेने आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन स्तरावर अनेक योजना कार्यान्वीत करण्यात आले.

मलेरियाला आमंत्रण देते बनगावचे उपकेंद्र
आमगाव : आमगाव तालुक्यात रुग्णांना सुलभतेने आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन स्तरावर अनेक योजना कार्यान्वीत करण्यात आले. परंतु रुग्णालय उपलब्ध आहेत परंतु रुग्णालयातील सुविधेअभावी रुग्णांना अखेरचा श्वास घ्यावा लागत आहे. या रूग्णालयाच्या परिसरात झाडे झुडूपे व केरकचरा असल्यामुळे रूग्णांना मलेरियाची भिती सतावत आहे.
आमगाव तालुक्यात आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरूवात करण्यात आली. तर तालुका पातळीवर जिल्हास्तरातील जिल्हा रुग्णालयातील सुविधा तालुक्यातच उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामीण रुग्णालयाची पायाभरणी करण्यात आली. परंतु रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतरचे उपचार मात्र व्हेटिलेंटरवर आहे.
आमगाव तालुक्यातील दीड लाख लोकांना रुग्णसेवा वेळेतच मिळावे यासाठी शासनाकडे अनेकदा मागणी करण्यात आली. तालुक्यात आमगाव व परिसरातील गावातील रुग्णांच्या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र संजीवनी म्हणून काम करीत आहे. तालुका ग्रामीण रुग्णालय रिक्त पदांमुळे व सुविधेच्या टंचाईमुळे मागासलेपणाने ग्रासले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ३०० पर्यंत रुग्णांची विविध व्याधींचा उपचार करण्यात येते. प्रसूती केंद्राच्या माध्यमाने शस्त्रक्रिया करण्यात येतात. परंतु रुग्णालयात अद्यावत यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागते. या रुग्णालयात रुग्णांच्या रक्ताचे तसेच विविध नमुन्याना तपासणी करण्यासाठी पॅथालाजी नाहीत. पॅथालॉजीचे तपासणीचे कार्य कंत्राटी पदविकाधारक व्यक्तीव्दारे तपासण्यात येत आहे. त्यामुळे रक्ताचे व विविध नमुन्यांची तपासणी योग्य पध्दतीने होत नाही. रुग्णालयांमध्ये एक्सरे मशीन नाहीत. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना २५ किलोमीटर अंतरावरचा प्रवास करावा लागतो. रुग्णालयातील खाटा व सुविधा पर्याप्त नाहीत. त्यामुळे रुग्णांना स्वत:च्या सोई सुविधांना घेऊन उपचार करावा लागतो. ग्रामीण रुग्णालयामध्ये रिक्तपदांमुळे नेहमीच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कामाचा ताण येतो. या रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवतो. या रुग्णालयात औषधांचा साठा ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली बांधकाम करण्यात आली. परंतु बांधकाम निकृष्ट असल्याने पावसाळ्यात औषधांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. तेच चित्र वर्ष लोटूनही तसेच आहे. त्यामुळे रुग्णांना लागणारी औषधी उघड्यावर पडून आहेत. रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी यांच्यावर नियंत्रण नसल्याने रुग्णालयातील स्वच्छता वाऱ्यावर आहे. रुग्णांना घाणीमध्येच स्वत:चे उपचार करून घ्यावे लागत आहे. रुग्णालयात रुग्णांचे रक्त तपासणीसह थुंकी, मुत्र तपासणी प्रयोगशाळा सुविधेअभावी बंद पडत आहे. अद्यावत तंत्र नसल्याने जुन्याच पध्दतीने तपासणी करण्यात येते. त्यामुळे या तपासणी अहवालावरच प्रश्न निर्माण होतो. या प्रयोगशाळेतील अनेक कर्मचारी स्वत:च रुग्ण आहेत. तालुक्यात रुग्णांना रक्ताची आवश्यकता पूर्ण व्हावे यासाठी ब्लड बँकेची मागणी आहे, परंतु मागणी पुर्ण झाली नाही. (शहर प्रतिनिधी)