ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमावर बंदी आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST2021-07-29T04:29:38+5:302021-07-29T04:29:38+5:30

अर्जुनी मोरगाव : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयात ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. समाज प्रगती व विज्ञानाच्या ...

Ban astrology courses | ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमावर बंदी आणा

ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमावर बंदी आणा

अर्जुनी मोरगाव : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयात ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. समाज प्रगती व विज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असतांना ज्योतिष विद्येमुळे अज्ञानाच्या खाईत जाण्याची दाट शक्यता आहे. या अभ्यासक्रमावर प्रतिबंध घालण्याची मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा अर्जुनी मोरगावच्यावतीने करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार विनोद मेश्राम यांना देण्यात आले.

विश्वविद्यालयाने ज्योतिविद्या या नावावर ज्योतिष विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खगोलशास्त्रात ज्योतिषला मान्यता देत नाही. विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्योतिषशास्त्राचा तीव्र विरोध करून ज्योतिषशास्त्राला खोटे ठरविले आहे. ज्योतिष ग्रहण करून युवावर्ग श्रम व पैसा व्यर्थ करेल. जे देशहिताचे ठरणार नाही. समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना ज्योतिषविद्येमुळे उलट अज्ञानाकडे जाईल. या अभ्यासक्रमावर बंदी घालावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी अंनिसचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रदीप भानसे, तालुका संघटक प्रा भगवंत फुलकटवार, महिला संघटिका माधवी हुमे, प्रा.एस.एस शहारे उपस्थित होते.

280721\1638-img-20210728-wa0001.jpg

तहसीलदारांना निवेदन देताना अ नि स कार्यकर्ते

Web Title: Ban astrology courses