शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

रस्ता बांधकामासाठी एक महिन्यापासून गिट्टी पडून, मात्र कामाला सुरुवात केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 4:03 PM

Gondia : आमगाव-सालेकसा मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; खड्डे बुजविण्याचे काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : आमगाव-सालेकसा- दरेकसा मार्गाच्या दुरवस्थेकडे वारंवार शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर या मार्गाचे एकूण पाच किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले. त्यासाठी गिट्टी आणि बजरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात आली आहे. परंतु महिनाभराचा कालावधी लोटूनही रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून आमगाव- सालेकसा मार्गाची पुनर्बाधणी किंवा दुरुस्ती झाली नसल्यामुळे या राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. याची वारंवार तक्रार केल्यानंतर आणि बातम्या प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम अधूनमधून केले. रस्त्यावरील खड्डे मुरूम मातीने बुजविण्यात आले. परिणामी आठ दिवसांतच रस्त्याची अवस्था 'जैसे थे' झाली. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच होते. अनेक अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली

आणि आमगाव ते दरेकसा दरम्यान पाच किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले. यात कावराबांध ते गोवारीटोला दोन किलोमीटर, पानगाव तलाव ते रॉढा एक किलोमीटर तसेच सालेकसा ते दरेकसा दरम्यान अर्धा अर्धा किलोमीटर वेगवेगळ्या ठिकाणी दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले. असे एकंदरीत पाच किलोमीटर रस्ता दुरुस्तीसाठी गिट्टी आणि बजरी चुरी टाकण्यात आली. परंतु गिट्टी बजरी चुरी टाकल्यापासून एक महिना लोटला तरी प्रत्यक्षात रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाला नाही. गिट्टी बजरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्यामुळे येणाऱ्या - जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेसुद्धा अपघात होऊ लागले. तर दुसरीकडे रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस जीवघेणे होऊ लागल्याने प्रवाशांचा त्रास आधीपेक्षा तीन पट वाढल्याचे चित्र आहे. रस्ता दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असताना ते म्हणाले की रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. परंतु दुरुस्तीचे काम करण्यासाठी लागणारे मजूर वर्ग मिळत नसल्याने कामास विलंब होत असल्याचे सांगितले.

एवढ्या मोठ्या कंत्राटदाराला मजुरांची अडचण का?आमगाव-सालेकसा-दरेकसा रस्ता दुरुस्तीचे काम वालिया अँड सन्स कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र, ही कंपनी रस्ता दुरुस्तीसाठी मजूर मिळत नसल्याचे सांगत कामास विलंब करीत आहे. मात्र, याचा फटका वाहन चालक आणि गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

खड्डे बुजविण्याची गरजरस्ता दुरुस्तीचे काम सुरू होत आहे म्हणून खड्डे बुजविण्याचे कामसुद्धा थांबविण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होताना दिसत नाही तर दुसरीकडे खड्यांची संख्या वाढत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे फार जिकिरीचे झाले आहे. या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत. परंतु बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदार याकडे गांभीर्याने विचार करीत नसल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा