बळीराजाची ‘बरसो रे मेघा’ची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:28+5:30
शेतकऱ्यांनी थोडा पाऊस झाल्यानंतर पेरण्या केल्या होत्या त्यांच्यांवर सुध्दा पावसाअभावी दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. येत्या आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच बळीराजा बरसो रे मेघा मेघाची हाक देत असल्याचे चित्र आहे.

बळीराजाची ‘बरसो रे मेघा’ची हाक
नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहे. तर काही शेतकऱ्यांनी थोडा पाऊस झाल्यानंतर पेरण्या केल्या होत्या त्यांच्यांवर सुध्दा पावसाअभावी दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. येत्या आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच बळीराजा बरसो रे मेघा मेघाची हाक देत असल्याचे चित्र आहे.
मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यानंतर आणि एक दोनदा चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. मात्र यंदा मृगाच्या सरी दमदार बसरल्या नाही. तर जवळपास २० दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या कोरड्या पडल्या आहेत.
जून महिन्यात एक दोनदा जिल्ह्यात थोड्या फार प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्यांनी वेळेत पेरणीची कामे पूर्ण केली आहे. मात्र बºयाच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना पऱ्हे वाचविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री न करता आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. तर आता वरुण राजाने देखील त्यांच्याकडे पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत एकूण १४ हजार हेक्टरवर पऱ्हे टाकून पूर्ण झाले आहे.
तर अजून बऱ्याच प्रमाणात पेरणी होणे शिल्लक आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ नाकारता येत नाही. त्यामुळे बळीराजासह जिल्ह्यावासीयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
पाऊस लांबल्याने तूट वाढली
जिल्ह्यात यंदा मृगाच्या सरी दमदार बरसल्या नाही तर त्यानंतरचे पावसाचे नक्षत्र सुध्दा कोरेड गेले. पाऊस लांबत असलेल्या पावसाची तूट सुध्दा वाढत आहे. जिल्ह्यात २८ जूनपर्यंत सरासरी १५०.७६ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी १३२७ मिमी पाऊस पडतो. मात्र जून महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाची तूट वाढत चालल्याने पाऊस यंदा सरासरी गाठणार की नाही अशी चिंता जिल्हावासीयांना सतावित आहे.
नदी नाल्यांना ही पावसाची प्रतीक्षा
रविवारी जिल्ह्यात ७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ करण्यात आली. यात गोंदिया शहरातील कुंभारेनगर,फत्तेपूर, डोंगरगाव, या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता एकूण १५ कंटेन्मेंट झोन आहेत.
जिल्ह्यात अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रीय झालेला नाही. हवामान विभागाने सुध्दा येत्या सात आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. पेरणी आणि पºह्यांसाठी पाऊस गरजेचा आहे. आठ दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.