पिशव्या पर्यावरणास घातक

By Admin | Updated: June 26, 2014 23:24 IST2014-06-26T23:24:19+5:302014-06-26T23:24:19+5:30

दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिगडल्याच्या सूचना जागतिक स्तराच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रसारित करण्यात येत आहे.

Bag environmentally fatal | पिशव्या पर्यावरणास घातक

पिशव्या पर्यावरणास घातक

रावणवाडी : दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिगडल्याच्या सूचना जागतिक स्तराच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रसारित करण्यात येत आहे. मात्र प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालून पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार नाही. यावेळी अस्तित्वात असलेल्या खाद्य पदार्थांची पॅकींग विशिष्ट व सर्व वातावरण सहन करण्याऱ्या सिलबंद प्लास्टीक पिशव्यात केली जाते. या खाद्य पदार्थांची विक्री सर्वत्र जोमात होवून या पिशव्या प्रत्येक ठिकाणी साचतात. गावच्या परिसरात मोठ्याने अस्तव्यस्त पसरल्याचे त्या दिसतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्लास्टीक वस्तुचा उपयोग हल्लीच्या काळात मोठ्या जोमाने फोफावला आहे. कोणत्याही ठिकाणी कोणताही समारंभ असो किंवा लग्न सोहळा असो यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक वस्तुंची उधळपट्टी करण्यात येते. अल्प काळासाठी उपयोग करुन कुठेही मोकळी जागा दिसली की त्या ठिकाणी या वस्तू फेकून मोकळे होत असतात. शासनाने ५० मॉयकानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घातली. मात्र बहुतांश व्यवसायीक जाडीदार ठिसूळ प्लास्टीक पिशव्यांचा वापर करतात. त्या अल्प काळातच जमिनीत मुरुन नाहीशा होत आहेत. मात्र खाद्य पदार्थांच्या पॅकींगमध्ये येत असलेल्या प्लास्टीक पिशव्या मजबूत, टिकावू व दर्जेदार असल्यामुळे त्या बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतात. एकदा या पिशवीत खाद्यपदार्थ भरुन पॅकींग झाल्यावर या पॉकीटमधून थोडीसुद्धा हवा बाहेर निघत नाही.
या खाद्य पदार्थांच्या पॉकीटमधून खाद्यपदार्थ खावून उरलेल्या प्लास्टीक पिशव्या चालता फिरता कुठेही फेकल्या जातात. त्यामुळे पाळीव आणि मोकाट जनावरे त्या पिशव्या खावून मोठ्या संख्येने मृत पावल्या आहेत. तर काही प्लास्टीक पिशव्या सांडपाणी वाहणाऱ्या नालीत साचून अडकून राहिल्याचे दिसून येतात. त्यामुळे सांडपाण्याचा निचराही होत नाही.
शासनाने प्लास्टीक पिशव्यावर बंदी घातली आहे. परंतु खाद्यपदार्थांच्या हवाबंद प्लास्टीक पिशव्यांना यातून वगळण्याचे काय कारण असावे, हे संबंधित प्रशासनालाच माहीत? या खाद्य पदार्थांच्या पिशव्या जागोजागी पसरत असल्यामुळे गावचा चेहरा-मोहरा बदलत आहे. पूर्वी बऱ्याच वस्तूंची पॅकींग टिकावू दर्जेदार प्लास्टीक पिशव्यात केली जात होती. मात्र बऱ्याच उत्पादकांनी पॅकींगचे प्लास्टीक बदलून कागद मिश्रित प्लास्टीकच्या पॉकिटांचा उपयोग सुरू केला आहे. मात्र सध्या बाजारात व गावागावातील लहान मोठ्या दुकानदाराजवळ खाद्यपदार्थांची विक्री जोमात होत आहे. मात्र संबंधित विभागाने काही व्यवसायिकांना प्लास्टीक पिशव्यांच्या वापराची मुभा दिली असल्यामुळे पर्यावरणासह नागरिकांनाही त्रास सहन करावे लागत आहे. जनावरांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचा श्वासच कोंडल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Bag environmentally fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.