भीषण! एकतर्फी प्रेमातून तरुणीचे भररस्त्यात हातोड्याने डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 19:43 IST2022-02-23T19:42:03+5:302022-02-23T19:43:52+5:30
Gondia News रावणवाडी तालुक्यातील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या झिलमिली चिरामनटोला रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका तरूणीचा खून करण्यात आला. ही घटना २३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता घडली.

भीषण! एकतर्फी प्रेमातून तरुणीचे भररस्त्यात हातोड्याने डोके फोडले
गोंदिया : रावणवाडी तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या झिलमिली चिरामनटोला रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका तरूणीचा खून करण्यात आला. ही घटना २३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता घडली.
धनश्री गोपाल हरिणखेडे (१८) रा. चिरामनटोला ता. गोंदिया असे मृत तरूणीचे नाव आहे. ती तरूणी शिकवणी वर्गासाठी जात असताना तिच्यावर प्रेम करणाऱ्या माथेफिरू प्रियकराने हतोड्याने मारून तिचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात तिला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
धनश्री गोपाल हरिणखेडे (१८) ही शिकवणीसाठी जात असतांना झिलमीली चिरामनटोला रस्त्यावर आरोपी दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले (२३) याने हाथोड्याने डोक्यावर वार करून तिचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच रावणवाडीचे ठाणेदार उध्दव डमाळे यांनी घटनास्थळ गाठून त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरूणीला गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणले. तिला पाहताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्या माथेफिरू प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.