सारसांच्या संवर्धनासाठी रसायनांचा वापर टाळा

By Admin | Updated: January 26, 2016 02:39 IST2016-01-26T02:39:35+5:302016-01-26T02:39:35+5:30

सारसांचे अस्तित्व असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर न जैविक कीटकनाशकांचा वापर करु

Avoid the use of chemicals to conserve cranes | सारसांच्या संवर्धनासाठी रसायनांचा वापर टाळा

सारसांच्या संवर्धनासाठी रसायनांचा वापर टाळा

गोंदिया : सारसांचे अस्तित्व असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर न जैविक कीटकनाशकांचा वापर करु न या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही याची काळजी संबंधित शेतकरी बांधवांनी घ्यावी. अशा शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी सूचना पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.
सारस महोत्सवाचे औचित्य साधून ना.बडोले यांनी आपल्या सौभाग्यवती शारदाताई बडोले यांच्यासह रविवारी पहाटे सारस पक्ष्यांचे अस्तित्व असलेल्या गोंदिया तालुक्यातील झिलमिली आणि परसवाडा तलाव परिसराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना सारस पक्षी बघायला मिळाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, मानद वन्यजीवरक्षक सावन बहेकार, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक समीर बनसोडे व सारस संवर्धनासाठी पुढाकार घेत असलेले लोक प्रामुख्याने उपस्थित होते.
सारसांसह अन्य स्थलांतरीत पक्षी मोठ्या प्रमाणात या तलाव परिसरात दिसत असल्यामुळे त्यांच्या उपजिविकेसाठी लागणारे शेवाळ, पाणगवत, देवधान, कीटक धोक्यात येणार नाही याची काळजीसुद्धा परसवाडा येथील जैविक विविधता समितीने घ्यावी असे समितीच्या सदस्यांना ना.बडोले यांनी सांगितले. परसवाडा येथे जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या पक्षीविषयक माहिती केंद्राची पाहणी त्यांनी यावेळी केली. या केंद्रात सारस व अन्य स्थलांतरीत पक्षांची छायाचित्रे तसेच जैवविविधतेबाबतची माहिती पर्यटकांना व पक्षी अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे.
पालकमंत्र्यांनी यावेळी परसवाडा जैविक विविधता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सलीम शेख-अध्यक्ष, डुलेंद्र हरिणखेडे-सरपंच, गोविंद उईके-उपसरपंच, लखन हरिणखेडे, दिनेश हरिणखेडे, राहूल भावे, रितराम क्षीरसागर, गौरव बोपचे, मुन्नालाल पारधी व अनुराग शुक्ला उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
सारस महोत्सवाचा
समारोप ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला
४सारस पक्ष त्याच्या देखणेपक्षासाठी जसा ओळखला जातो तसेच त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी जोडीदाराशी एकनिष्ठ राहून करणाऱ्या प्रेम करणारा पक्षी अशी त्याची ओळख आहे. एकदा दोन सारसांची (नर-मादी) जोडी जमली तर आयुष्यभर ते सोबतच जगतात आणि सोबतच मरतातही. म्हणजे एक जोडीदार दगावल्यास दुसराही प्राण सोडतो. त्यांच्या या अनोख्या प्रेमामुळेच जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘सारस महोत्सवा’चा समारोप ३१ जानेवारीऐवजी व्हॅलेंटाईन्स डे अर्थात प्रेम दिनाला केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.

- संवर्धनातील अडचणींवर चर्चा
४ सारस पक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यांचा धोक्यात असलेला अधिवास, त्यांच्या घरट्यांची जपणूक या विषयावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, मानद वन्यजीव रक्षक व जैविक विविधता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
४ सारस पक्षांना बघण्यासाठी आता पर्यटकांची व पक्षी अभ्यासकांची पावले मोठ्या प्रमाणात झिलमिली व परसवाड्याकडे वळत आहे. हे पक्षी बघताना आपल्यापासून त्यांना धोका जाणवेल अशा प्रकारचे कृत्य कोणीही करु नये. सारस दिसल्यानंतर त्याला जवळून पाहण्याचा, टाळी, शिट्टी वाजविण्याचा मोह टाळावा.
४ परसवाडा तलावाजवळ उभारलेल्या पक्षी निरीक्षण मनोऱ्यावरून सारस व अन्य पक्षी बघावे तसेच तलावाजवळ पॉलीथीन पिशव्या कुणीही टाकू नये अशी सूचनाही यावेळी करण्यात ाली.
४ सारस संरक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करु न त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.

गावकऱ्यांमध्ये जागरुकता
४सारस महोत्सवामुळे सारस व अन्य स्थलांतरीत पक्षांचे संरक्षण आणि संवर्धनाची लोकचळवळ उभी झाल्याचे चित्र पालकमंत्र्यांना परसवाडा गावात प्रवेश करताना दिसून आले. अनेक घरांच्या भिंतीवर सारसांचे तसेच ग्रे लेग गूज, बार हेडेड गूज, नॉर्थन पिंटेल, फिजंट टेल जकाना, परपल स्पॅम्पेन, कॉम्ब डक, लेसर व्हिसलींग डक आदी स्थलांतरीत पक्षांचे चित्र पहावयास मिळाले.

Web Title: Avoid the use of chemicals to conserve cranes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.