देवरी-चिचगड मार्गावर आॅटो-दुचाकीची धडक
By Admin | Updated: July 17, 2015 01:23 IST2015-07-17T01:23:06+5:302015-07-17T01:23:06+5:30
पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या देवरी-चिचगड मार्गावरील सालई या गावाजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक आॅटो व मोटारसायकलची धडक झाली.

देवरी-चिचगड मार्गावर आॅटो-दुचाकीची धडक
देवरी : पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या देवरी-चिचगड मार्गावरील सालई या गावाजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक आॅटो व मोटारसायकलची धडक झाली. या धडकेत आॅटोमधील व मोटारसायकल सवार ११ प्रवासी जखमी तर ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारार्थ गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात हलविण्यात आले.
सविस्तर असे की दि.१४ ला मंगळवार असल्याने येथे साप्ताहिक आठवडी बाजार भरतो. त्यामुळे या दिवशी लोकांनी आवागमन येथे जास्त असते. याच कारणाने मंगळवारी देवरीवरुन चिचगडकडे आॅटो क्रमांक एमएच ३५/१५३२ या गाडीत प्रवाशी भरुन जात असता सामोरुन येत असलेल्या मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एक्स ९३५४ यांच्यात आमोरासमोर जोरदार धडक झाली.
यात आॅटोमध्ये बसलेले राजेश् पुरुषोत्तम शहारे (४०), चंदनलाल हिरालाल उके (४६), हरिदास नामदेव शहारे (४०) व मिराबाई नारायण शहारे (४५) हे चार प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना तातडीने गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात हलविण्यात आले.
प्यारेलाल चैतर ाम वालदे (४०), मंजुलता नंदलाल नरेटी (२०) सर्व राहणार केशोरी आणि नंदलाल हिरालाल उईके (४३), चैतराम बलीराम नेताम (४०) दोन्ही रा. निलज व आॅटोचालक अशोक भाऊराव खरोले आणि मोटरसायकल चालक राजेश पुरुषोत्तम शहारे (५०) आणि मागे बसलेला हरदेव नामदेव शहारे (५०) सर्व रा. देवरी हे जखमी झाल्याने त्यांना देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.