जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न
By Admin | Updated: June 28, 2014 01:08 IST2014-06-28T01:08:00+5:302014-06-28T01:08:00+5:30
जमीनीच्या कारणावरून ११ जाणांनी एकाला राड, हॉकीस्टीक व देशीकट्यातील गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारच्या रात्री १२.३० वाजता दरम्यान शहराच्या रेलटोली येथील गुरूव्दाराजवळ घडली.

जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न
गोंदिया : जमीनीच्या कारणावरून ११ जाणांनी एकाला राड, हॉकीस्टीक व देशीकट्यातील गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारच्या रात्री १२.३० वाजता दरम्यान शहराच्या रेलटोली येथील गुरूव्दाराजवळ घडली.
या हल्यात क्रिष्णा सुभाष भांडारकर (३७) रा. टीबीटोली पेट्रोलपंप मागे गोंदिया हे गंभीर जखमी झाले. क्रिष्णा भांडारकर आपला मित्र बाबी मुजुमदार सोबत मोटार सायकलने घरी जात असताना रात्री १२.३० वाजता आरोपी बबलू सैय्यद रा. रामनगर, इब्रान महेफूज खान उर्फ सफीखान रा. टीबीटोली, सत्तू नशिने रा. रामनगर व इतर आठ अश्या ११ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हॉकीस्टीक व लोखंडी राडने त्यांच्या डोक्यावर मारले. बबलू सैय्यद याने क्रिष्णावर देशीकट्यातून गोळी झाडली. मात्र ती गोळी क्रिष्णाला लागली नाही. रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या क्रिष्णाला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. सत्तू नशिने याने हा गुन्हा करण्यासाठी इतर दहा जणांना एकत्र आणले होते. असे पोलिसांनी नमूद केले आहे. जमीनीच्या खरेदी-विक्रीत तू पडू नकोस असा सल्ला आरोपी क्रिष्णाला देत होते. परंतु क्रिष्णाने त्यांची न ऐकल्यामुळे त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. सदर प्रकरणातील ११ आरोपींवर रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४४, १४७, १४८, ३०७, १०९ सहकलम ३, २५, २७ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)